नांदेडसोशल वर्क

Tehsildar Parlikar : लोहा तालुक्यातील विविध प्रमाणपत्र थेट “व्हाट्सअप “वरच मिळणार -तहसीलदार परळीकर यांचा उपक्रम

लोहा| मुख्‍यमंत्री यांचा शंभर दिवस अभियान महाराष्‍ट्र शासनच्‍या वतीने राबवीण्‍यात येत आहे. जिल्‍हाधिकारी राहुल कर्डीले यांनी ई – ऑफिस करण्याचा निर्णय घेतला असून त्यादृष्टीने लोहा तहसील कार्यालयात तयारी सुरू आहे याचं उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील सर्व नागरिक तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रमाणात व्हाट्सऑप द्वारे मिळणार असून सेतू सुविधा केंद्र संचालक याना तसे निर्देश देण्यात येणार आहेत.त्यामुळे बाहेर गावी राहण्याची सोय होणार असून तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनीं संपूर्ण कार्यालय ई ऑफीस करण्‍यासाठी निर्देश दिले आहेत त्यादृष्टीने तहसील व अन्य विभाग तयारी करत आहेत.मुख्यमंत्री यांचा १०० दिवसाचे अभियाना अंतर्गत तहसीलदार विठठल परळीकर , व्हाट्सऑपवर प्रमाणपत्र देण्याची सुविधा सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. आपले सरकार – सेतू सुविधा केंद्र चालविणाऱ्याची लवकर बैठक घेतली जाणार आहे तर उत्पन्नाचा दाखला (मिळकतीचे प्रमाणपत्र,) जात (कॉस्ट सर्टिफिकेट) प्रमाणपत्र रहिवाशी प्रमाणपत्र, वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास (रहिवासी )प्रमाणपत्र,अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र,पत दाखला,जात प्रमाणपत्र, डोंगरी असल्याचा दाखला, इत्यादी प्रमाणपत्र अर्जदारच्‍या whats up वर असा नवीन उपक्रम सुरू करण्‍यात येत आहे.

अनेक विदयार्थी ग्रामीण भागात राहतात बाहेर गावी शिक्षण , कामधंदा ,नौकरी व अन्य कारणास्तव गाव सोडूम बाहेर असतात त्‍यांना मुद्दामहून प्रमाणपत्रसाठीच गावाकडे तहसील कार्यालयात ये -जा करावी लागते सर्व ई- सेवा व आपले सरकार चालक यांनी अर्जदाराचा अर्ज घेतानांच व्‍हॉटस अप मोबाईल क्रमांक घ्‍यावा .प्रमाण पत्रास मान्‍यता मिळताच अर्जदाराच्‍या” व्‍हॉटसअप “वर पीडीप प्रमाणपत्र पाठवून द्यावे अशी संकल्पना तहसीलदार विठ्ठल परळीकर यांची असून लवकरच याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button