
नवीन नांदेडl नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे नवनियुक्त जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिंदे गटात कांकाडीचे माजी सरपंच सुदीन पाटील बागल यांच्या सह अनेकांनी पक्ष प्रवेश केला आहे.


शिवसेना उपनेते हेमंत पाटील यांच्या हस्ते मध्यवर्ती कार्यालय येथे दक्षिण विधानसभा मतदार संघातील कांकाडी,तुप्पा भागासह ग्रामीण भागातील व सिडको हडको परिसरातील व पदाधिकारी असलेल्या दता पाटील कदम तुप्पा उपसरपंच, कैलास बागल ग्रामपंचायत सदस्य,दशरथ पाटील बागल तंटामुक्ती अध्यक्ष,शंभु गंगातीरे, ऋषीकेश भवर,रावण पाटील वर्तळे, उपसरपंच काळेश्वर बागल ,नंदु वर्तळे,प्रदीप कोल्हे, देवानंद हणवते, भागवत भवर , तानाजी भवर , श्रीकांत देशमुख,राजु देशमुख, सर्जेराव वर्तळे,शिवा सोळंके, नंदु वर्तळे या प्रमुख पदाधिकारी यांच्या सह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या हस्ते प्रवेश देण्यात आला आहे.

ऐन निवडणुकीच्या काळात विनय पाटील गिरडे यांच्यी नियुक्ती झाल्यानंतर नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेत आहेत.


यावेळी नांदेड दक्षिण तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे, शिवसेना सिडको ऊपशहरप्रमुख पप्पू गायकवाड यांच्या सह दक्षिण भागातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




