नांदेडमहाराष्ट्र

हदगाव शहर व तालुक्यात कोट्यावधी रुपायाच्या विकास कामावर माहीतीचा फलकच नाही – NNL

कंत्राटदाराच्या नावावर कुणीतरी तिसरेच काम करीत असल्याचा संशय..?

हदगाव, शेख चांदपाशा| शासनाच्या विविध योजनाद्वारे हदगाव शहर व तालुक्यात बहुतांशी सुरु असलेल्या विकास कामाची माहीती देणारे फलक संबंधित कञांटदारांनी लावले नसल्याने या कामात ‘कुछ तो गडबड है ‘चे स्पष्ट मत बहुतांशी रोडचा दर्जा पाहील्यावर दिसुन येत आहे.

हदगाव शहरात तालुक्यात कोट्यावधी रुपयाचे निधीतून रोडचे विकास कामे सुरु आहेत. यामुळे शहरातील नागरीक व गावातील ग्रामस्थ संभ्रमात असून, शासनाच्या विविध विभागाकडून उपलब्ध होणाऱ्या करोड रुप्याच्या कामाची माहीती नागरिकांनाच नाही अशी परिस्थिती दिसून येत आहे. शासना दारे लोकप्रतिनिधींनी विकास कामाच्या नावाखाली निधी आणला अस सागतात. पण ते काम कोणत्या कंञाटदाराच्या नावावर कोणत्या एजन्सीच्या नावावर आहे, आणि काम कुणी तरी तिसरी व्यक्ती करत असल्याने माञ कामाचा काहीच दर्जा राहीलेला नाही. या बाबतीत नागरिक व ग्रामस्थ अनभिज्ञ असुन, संबंधित विभाग काम आमच्या विभागामार्फत नाही अस सागुन मोकळे होतात.

विशेष म्हणजे कोणतेही विकास काम असो त्या कामाच्या ठिकाणी माहीती फलकावर कामाच्या मंजुरीची तारीख मुख्य कामातील घटक योजनेसाठी एकाग्र निधी कञांटदाराचे नाव व संबंधित अधिका-याच नाव व मोबाईल क्रमांक कामाची मुदत यासह कामाचा तपशिल दिला जातो. माञ असे फलक सुरु असलेल्या एकही कामावर दिसुन ये तनाही हे आवर्जून उल्लेख करावा लागेल.

न.पा.प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकावर जबाबदारी ढकलतात..
हदगाव शहरात रोडचे बहुतांशी प्रभागात जिथे आवश्यकता नाही तिथे आपल्या सोयीनूसार कञाटदारानी राजकीय नेत्यांना हताशी धरुन कामे आणलेली आहे. तिथेच थातुर मातुर कोणतेही नियोजन न करता सिमेंट रोडची कामे करण्याचा सपाटा लावला आहे. या बाबतीत न.पा. मुख्याधिकारी यांना माहिती विचारली असता त्यांच्या माहीतीनूसार शहरातील बहुसंख्य कामे सा.बा विभागाद्वरे करण्यात येत असल्याच सागितल. जेव्हा हदगाव शहरातील उपविभागीय सा.बा. विभागाशी संपर्क साधला असता नेहमी प्रमाणे अलिशान कार्यालयातुन साहेब दौ-यावर असल्याचे नेहमी प्रमाणे सागण्यात आले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button