Lightning strikes and hailstorms : विजांचा कडकडाट होऊन गारपीट ; शिजवलेल्या हळदीसह, मका, ज्वारीचं नुकसान
हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर शहर तालुक्यात विजांचा कडकडाट होऊन गारपीट झाली असून, अर्धा तास झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांनी शिजवलेल्या हळदीसह, मका, उन्हाळी ज्वारीचं प्रचंड नुकसान झालं आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने मदतीचा हाथ द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुका परिसरात उन्हाचा तडाखा वाढला असून, प्रशासनाने दिलेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याच्या ईशाऱ्याने शेतकरी उन्हाची परवा न करता शेतीत राबत आहेत. अश्यातच मंगळवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वारे, विजांचा कडकडाट होऊन जोरदार गारपीट झाली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची दैना होऊन शिजविलेले हळद भिजून उत्पन्नाची क्वालिटी खराब होण्याची भीती व्यक्त होत आहे.
तसेच कापून ठेवलेला मका भिजून गेला असून, उन्हाळी ज्वारी जमीनदोस्त झाली आहे. या पिकांना वाचवण्यासाठी शेतक...
