कृषीनांदेड

Agricultural dealer : उगम प्रमाणपत्राचा समावेश कृषी विक्रेत्याच्या परवान्यामध्ये आवश्यक -NNL

नांदेड| कंपनीच्या उगम प्रमाणपत्राचा समावेश परवान्यामध्ये नाही अशा कंपनीच्या किटकनाशकाची खरेदी व विक्री कृषी सेवा केंद्रधारकांनी करू नये. शेतकऱ्यांनी किटकनाशक खरेदी करते वेळेस पक्की पावती घेवून संबंधित कंपनीचे नाव कृषी विक्रेत्यांच्या परवान्यामध्ये असल्याची खात्री करून किटकनाशक खरेदी करावे, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

खरेदी व विक्री कृषी सेवा केंद्रधारकांनी ज्या किटकनाशकाची खरेदी कंपनी कडून करीत आहेत. त्या कंपनीचे उगम प्रमाणपत्र संबंधित घाऊक किटकनाशक विक्रेते यांनी परवान्यामध्ये समाविष्ठ करून खरेदी करावे. संबंधित घाऊक विक्रेते यांनी किटकनाशकाची विक्री करतांना खरेदी करणाऱ्या कृषी सेवा केंद्रधारकांच्या परवान्यामध्ये संबंधित कंपनीचे उगम प्रमाणपत्र समाविष्ट असल्याची खात्री करूनच किटकनाशकाची विक्री करावी. तसेच किरकोळ कृषी सेवा केंद्रधारकांनी त्यांना ज्या कंपनीच्या किटकनाशकांची खरेदी व विक्री करावयाची आहे अशा कंपनीच्या उगम प्रमाणपत्राचा समावेश त्यांच्या परवान्यात करावा असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button