आरोग्यनांदेड

Dr. Sangeeta Deshmukh ; रुग्णांना नवजीवन देण्यासाठी जिल्यात ‘अवयवदान’ चळवळ म्हणून राबवा – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख

मा. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्या नियोजनाने दि. ३ ते १५ ऑगस्ट दरम्यान अवयवदान चळवळ राबविन्यात आहे. जिल्यात अवयवदानाचे प्रमाण वाढावे व अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना नवजीवन मिळावे यासाठी येत्या ३ ते १५ ऑगस्ट दरम्यान अवयवदान ही एक चळवळ म्हणून जिल्ह्यात राबवावी, असे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी आयोजित जिल्हास्तरीय बैठकीत दिले.

राज्यात दि. ३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राज्यात ‘अवयवदान पंधरवडा’ म्हणून राबविण्यात येत असून, अवयवदान उपक्रमाचा आढावा घेतला व अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांसाठी त्यांना नवजीवन मिळावे, यासाठी अवयवदान ही एक चळवळ म्हणून राबवावी व व्यापक प्रमाणावर जनजागृती करावी, असे निर्देश दिले.

अवयवदानाबाबत सकारात्मकरित्या मतपरिवर्तन करून अवयवदानाविषयी असणारी भीती कमी करावी, तसेच प्रभावीपणे पद्धतीने काम करून सकारात्मक परिणाम दिसतील अशी विश्वासार्ह मोहीम दि. ३ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राबवावी, त्याचप्रमाणे, दि. १५ ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात अवयव दात्यांचा सत्कार करावा व मोहिमेला सकारात्मकरित्या गती द्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

राज्यातील मोहिमेचा नियमित आढावा घेऊन अवयवदानासाठी व्यापक जनजागृती करावी, लोकांमध्ये असणारी भीती कमी करून सामाजिक दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत तसेच अवयवदानासाठी कार्यरत असणाऱ्या आरोग्य संस्था यांनी व्यापकपणे काम करून जिल्ह्यात अवयवादामध्ये अग्रेसर ठेवावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. अवयवदानाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे. आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून अधिकाधिक रुग्णांना अवयव मिळावेत, यासाठी पंधरवड्यात प्रभावी कामकाज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

राज्यात ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत अवयवदान पंधरवडा म्हणून राबवन्यात येत असून जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. या बैठकीला तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी व वैधकीय अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button