Dr. Ganesh Joshi : व्हॉईस ऑफ मीडियाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी डॉ. गणेश जोशी यांची निवड -NNL

नांदेड| व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या राष्ट्रीय संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी प्राचार्य डॉ. गणेश जोशी यांची निवड शिर्डी येथील अधिवेशनात करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तर नांदेड जिल्ह्याचे मावळते अध्यक्ष श्रीनिवास भोसले यांची राज्य कार्यकारिणीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

मागील दोन वर्षांपासून प्राचार्य डॉ. गणेश जोशी हे संघटनेचे काम प्रभावीपणे करत असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन दि. 1 सप्टेंबर रोजी शिर्डी येथे व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेचे अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनात व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या मान्यतेने नांदेड जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश जोशी यांची निवड प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, मराठवाडा विजय चोरडीया यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून करण्यात आली. या निवडीबद्दल सर्व स्तरातून डॉ. गणेश जोशी यांचे अभिनंदन केले जात आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button