उस्माननगर l मातृभूमी सेवा संघ गोसेवा व श्रीकृष्ण गोशाळा पोखरभोसी ता.लोहाच्या वतीने स्वराज्य पब्लिक स्कूल ढाकणी पाटी,किवळा येथे मा.पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा वाढदिवस गोमाता पूजनाने आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.
प्रथम सर्वांनी फुलांचा वर्षाव करून गोमातेचे स्वागत केले.चिमुकल्यांनी “गोमाता की जय”अश्या घोषणा देत फुले उधळून आनंद व्यक्त .


गाईच्या पाठीवर भगवी झुल,गोंडे,मटाटी,घागर माळा,डोक्यावर अलंकृत छत्री लावून सजविण्यात आले होते. “छोटी छोटी गैया,छोटे छोटे ग्वाल,छोटेसे मेरे,मदन गोपाल” या गीताच्या तालावर विद्यार्थ्यांनी ठेका धरत गोमाता भोवती फेर धरला होता.

गोशाळा महासंघाचे नांदेड जिल्हा सचिव प्रल्हाद घोरबांड यांचे हस्ते गोपुजन करण्यात आले.समस्त महाजन मुंबईचे अध्यक्ष गिरीशभाई शहा यांच्या सूचनेवरून कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शाळेच्या वतीने मान्यवरांचे शाल व पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.



गाईंच्या दूधाचे महत्त्व तसेच विषमुक्त अन्नासाठी गाय किती आवश्यक आहे असे सांगून चिमुकल्यांना गोमातेची ओळख करून देण्यात आली.मा.पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी करत असलेली विकास कामे व त्यांच्या जागतिक स्तरावरील कार्याचा गौरव करून अभिष्टचिंतन करण्यात आले.

कवी प्रल्हाद घोरबांड यांची गाय ही कविता “बाबा,बाबा….एक गाय आणा घरी,वासरासंगे खेळेल मी आपल्या दारी ……” सामूहिकपणे गाण्यात आली.
यावेळी विनोद मालू,गंगाधर एकाळे,प्रल्हाद घोरबांड व परिसरातील बंधू-भगिनी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कोटगीरे मॅडम व सर्व स्टाफ, गजानन मस्के सर,पालक यांची उपस्थिती होती.
सर्व मुलांना कपाळावर अष्टगंध लावून खाऊ वाटप करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.अशोक कपाळे यांनी उपस्थितांचे व संस्थेचे संचालक गजानन मस्के सर यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्र संचालन शालिनी गायकवाड मॅडम यांनी केले.सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

