नांदेड| शहरातील दिपनगर येथील भाजी-पाला मार्केट कमिटीच्या अध्यक्षपदी सुरेश पवार तर उपाध्यक्षपदी संगिताबाई पारवे यांची सर्वानूमते निवड करण्यात आली.
दिपनगर मार्केट कमिटीच्या वतीने आज दि. २ जानेवारी रोजी अन्नदान वाटप कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. कार्यक्रमानंतर एक बैठक घेवून दिपनगर मार्केट कमिटीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी सुरेश पवार, उपाध्यक्षपदी संगिताबाई पारवे यांची निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारीणीत कोषाध्यक्षपदी गिरीधारी थोरात, सल्लागार सुरज वाघमारे तसेेच सदस्यपदी कैलास गाडगीळ, पावडे, अब्दुल रहेमान, हारून रशीद, मामा चवने, राजू पारवे, केशव पावडे, मनिषा पाटील, मोहम्मद अनीस, रहेमान सय्यद, हारून, धारु बुक्तरे, गयाबाई खंदारे, कौतिकबाई गायकवाड यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित कार्यकारणीचे भाजपा सरचिटणीस क्षितिज जाधव व मित्रपरिवारांनी अभिनंदन केले.