धार्मिकनांदेड

Ganapati Bappa… Shri Visarjan procession : वाढोणा शहरात सुखकर्ता…दुखहर्त्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप…. टाळ मृदंगाच्या वाणीमध्ये निघाली श्री विसर्जन मिरवणूक – NNL

हिमायतनगर, अनिल मादसवार| गणपती स्थापनेच्या ११ व्या दिवशी अनंत चर्तुदशी दि.१७ सप्टेंबर रोज मंगळवारी आल्याने दुपारी २ वाजता गाजत निघालेली श्री गणपती बाप्पाची मिरवणूक रात्री ०१ वाजेपर्यंत सुरू होती. प्रथम शहरातील मानाचा श्री परमेश्वर मंदिरातील पालखी गणपती, वडाचा गणपती, येथील इच्छापूर्ती श्री वरद विनायक मंदिरातील गणपती, कोनाड्यात गणपतीसह शहरातील अनेक गणपतीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी गणेशभक्तांनी तूच सुखकर्ता… तूच दुखहर्ता… अवघ्या दिनाच्या नाता… बाप्पा मोरया रे…, गणपती अपने गांव चाले… कैसे हमको चैन पडे…, निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी…. चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी…, अश्या विविध धार्मिक गीतांच्या उत्साहपूर्ण वातावरणात गणपती बाप्पाला जड अंतकरणाने भावपूर्ण निरोप दिला.

IMG 20240917 112329 Ganapati Bappa... Shri Visarjan procession : वाढोणा शहरात सुखकर्ता...दुखहर्त्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप.... टाळ मृदंगाच्या वाणीमध्ये निघाली श्री विसर्जन मिरवणूक - NNL

मंगळवारी अकराव्या दिवशी जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरातील मानाच्या गणेशाची पालखी मिरवणूक टाळ – मृदंगाच्या गजरात व ढोल – ताश्याच्या वाद्यात सकाळी ११ वाजता काढण्यात आली. गावातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढल्यानंतर ठिकठिकाणी महिला पुरुष भाविकांनी मनाच्या गणपतीचे दर्शन घेतले. त्यांनतर दुपारी १२.३० वाजता श्री कनकेश्वर तलावाच्या विहिरीत गणरायाचे विसर्जन करण्यात आहे. यावेळी मंदिर कमिटीच्या सदस्यांसह भजनी मंडळी व बालगोपाळ सहभागी झाले होते. दुपारी ०२ वाजता शहरातील प्रथम क्रमांकाच्या व्यापारी गणेश मंडळापाठोपाठ सर्वच गणेश मंडळाच्या युवकांनी डीजेच्या तालावर भव्य मिरवणूक काढली होती. सायंकाळी या मिरवणुकीमध्ये आ.माधवराव पाटील जवळगावकर सामील झाले होते. शहरातील प्रसिद्ध मानाच्या वडाच्या मंडळाच्या ठिकाणी गणेश भक्त युवकांनी खिचडी, ५१ किलो लाडूच्या प्रसादाचे वितरण केले.

IMG 20240917 175810 Ganapati Bappa... Shri Visarjan procession : वाढोणा शहरात सुखकर्ता...दुखहर्त्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप.... टाळ मृदंगाच्या वाणीमध्ये निघाली श्री विसर्जन मिरवणूक - NNL

अनंत चतुर्थी निमित्त सर्वात प्रथम श्री परमेश्वर मंदिरातील पालखी गणेशाचे, त्यानंतर येथील वरद विनायक मंदिरातील गणेशाचे विसर्जन, त्यानंतर लहान बालकांच्या बाप्पाचे विसर्जन आनंदाने करण्यात आले. मुख्य मिरवणूक सायंकाळी ४ वाजता निघाली यावेळी गणरायाला निरोप देऊन शेवटचे दर्शन घेण्यासाठी हजारो महिला, पुरुष व बालभक्त रस्त्याच्या कडेला, विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर दुतर्फा प्रचंड गर्दी होती. इमारतींच्या खिडक्या, छतावर दाटीवाटीने उभे राहून भक्तांनी बाप्पाचे अखेरचे दर्शन घेतले.

IMG 20240917 182557 Ganapati Bappa... Shri Visarjan procession : वाढोणा शहरात सुखकर्ता...दुखहर्त्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप.... टाळ मृदंगाच्या वाणीमध्ये निघाली श्री विसर्जन मिरवणूक - NNL

दरम्यान नगरपंचायतीने शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवून मिरवणुकीतील अडथळा दूर केला, तसेच सतर्कता म्हणून अग्निशमन बंब, जीव रक्षक पथक, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होती. आणि ठिकठिकाणी विजेचे खांब लावून अंधार दूर करून गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीतील अडथळे दूर करण्यात आले. दरम्यान मिरवणुकीत सामील झालेल्यांसाठी अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय आणि महाप्रसादाचे वितरणही करण्यात आले. पोलीस प्रशासनाच्या वतीने मिरवणूकित कायदा व सुव्यस्था अबाधित ठेवण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान विसर्जन स्थळाच्या ठिकाणी नगरपंचायतीचे ओएस चंद्रशेखर महाजन, पोलीस निरीक्षक अमोल भगत, दुपारी महाविरचंद श्रीश्रीमाळ, सायंकाळी आमदार जवळगावकर, आदींसह अनेक अधिकारी कर्मचारी, पत्रकारांनी भेट देऊन श्री विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केले.

नगरपंचायत अधिकाऱ्यांनी केली गणपतीची आरती

IMG 20240917 193838 Ganapati Bappa... Shri Visarjan procession : वाढोणा शहरात सुखकर्ता...दुखहर्त्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप.... टाळ मृदंगाच्या वाणीमध्ये निघाली श्री विसर्जन मिरवणूक - NNL

हिमायतनगर येथे अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन निर्विघन पार पडावे यासाठी नगरपंचायतीने रस्ते, विसर्जन स्थळाची स्वच्छता, निर्माल्य संकलन, विद्दुत सुविधा, सुरक्षेच्या दृष्टीने जीवरक्षक दल तैनात केले होते. तसेच येथे यानेऱ्या भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था देखील केली होती. सकाळी १० वाजल्यापासून नगरपंचातीच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी उमरखेड – बोरी रोडवर असलेल्या कनकेश्वर तलावाच्या ठिकाणी उपस्थित होऊन छोट्या गणपतीचे संकलन करून विसर्जन केलं. तसेच शहरातील परवानाधारक मोठ्या गणपतीचे विसर्जन दुपारी २ वाजल्यापासून सुरु झाले होते. सायंकाळी श्री परमेश्वर गल्लीतील गणपतीच्या विसर्जन पूर्वी नगरपंचायतीचे कक्ष अधिकारी चंद्रशेखर महाजन यांनी गणरायाची आरती महापूजा केली.

IMG 20240917 175448 Ganapati Bappa... Shri Visarjan procession : वाढोणा शहरात सुखकर्ता...दुखहर्त्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप.... टाळ मृदंगाच्या वाणीमध्ये निघाली श्री विसर्जन मिरवणूक - NNL

IMG 20240917 181741 Ganapati Bappa... Shri Visarjan procession : वाढोणा शहरात सुखकर्ता...दुखहर्त्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप.... टाळ मृदंगाच्या वाणीमध्ये निघाली श्री विसर्जन मिरवणूक - NNL

IMG 20240917 104030 Ganapati Bappa... Shri Visarjan procession : वाढोणा शहरात सुखकर्ता...दुखहर्त्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप.... टाळ मृदंगाच्या वाणीमध्ये निघाली श्री विसर्जन मिरवणूक - NNL

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!