Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून’ – भाग १७ (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

यात्रेमध्ये सहभागी झालेल्या यात्रेकरुंच्या बोलक्या प्रतिक्रिया (संकलन: प्राचार्य सुधीर शिवणीकर,डॉ. प्रतीक्षा केंद्रे, सुरेश शर्मा ) मनोजगुरु जोशी पेठवडजकर (अध्यापक _याज्ञवल्क्य काण्व वेदपाठशाळा नांदेड तसेच जोशी परीवार नांदेड व भोकर )
1)श्री धर्मभूषण दिलीपभाऊ ठाकुर यांचा 25 व्या अमरनाथ यात्रेतील त्यांच्या सहवासातून मित्रता, सेवा व धर्मभाव कसे जोपासवयाचे हे त्यांच्याकडून समजले. श्रीकृष्णाकडुन मित्रता,हनुमानाकडुन सेवा, युधीष्ठीरा कडुन धर्म शिक्षण घेतलेले दिसते दिलीपभाऊंनी.नोंदणी केली तेंव्हापासून यात्रेला निघेपर्यंत त्यांनी आमच्या कडुन हेल्थ सर्टिफिकेट, बॅंकेत नोंदणी, वॉकींग, प्राणायाम, सोबत साहीत्य काय घ्यावे इ. संपुर्ण बारकाईने करुन घेतले हा झाला श्रीकृष्णासारखा मैत्रीभाव.


2)यात्रेला रेल्वेत बसल्यापासुन वंदेभारतचा आनंद, वाल्वोबस बालटालला निवासव्यवस्था, अमरनाथला दर्शनासाठी जाण्याचे मार्गदर्शन, सेवाभावी भंडाऱ्याचे रुचकर प्रसाद रुपी भोजन, प्रवासामध्ये सगळे आनंदी कसे रहातील यासाठी जोक, गेम, कोडे सोडवणे, भेंड्या, नामस्मरण या सर्व गोष्टी म्हणजे हनुमान रुपी सेवा.

3)अत्यंत कठीण असणारी अमरनाथ यात्रा अतिशय सहजरित्या भक्ताकडुन करुन घेणारे श्री दिलीप भाऊ खरोखरच धर्म भूषण आहेत. भाऊ ने आजपर्यंत अमरनाथच्या 25 यात्रा केल्या.सदर यात्रेमध्ये हजारो हिंदूंना श्री बर्फानी बाबाचे दर्शन घडवून आणले.या आजपर्यंतच्या यात्रेकरुंचा अभिप्राय घेतला असता भाऊंचे आजपर्यंतचे केलेले धर्मप्रचाराचे कार्य, सेवाभाव व त्यांनी आजपर्यंत राबवत असलेले विविध उपक्रम व त्यातून होणारी सेवा यांच्या आशीर्वादानेच आज पर्यंत कुठल्याही यात्रेकरूला साधी खरोच सुद्धा आली नाही. यातूनच त्यांचे सेवेचे सामर्थ्य लक्षात येते. सदर 25 व्या अमरनाथ यात्रेत आमच्या कुटुंबातील व मित्रपरिवारातील असे एकूण 22 यात्रे करून सहभागी झाले होते.भाऊंच्या मार्गदर्शनाखाली अशाच यात्रा आमच्या परिवाराला घडो व हिंदूची सर्वोच्च अशी समजणारी मानसरोवर यात्रा आम्हा सर्वांना घडो हीच बाबा बर्फानी चरणी प्रार्थना. भाऊ तसेच त्यांचे बंधु राजु भाऊ हे दोघे राम लक्ष्मणा सारखे सेवा देतात ही अभीमानाची बाब आहे.


सुरेशसिंह सद्दीवाल, परांडा
आम्ही यापूर्वी केसरी, विना वर्ल्ड सारख्या नामांकित ट्रॅव्हल एजन्सी सोबत टूर केलेल्या आहेत. पण माफक दरात उत्तोमत्तम सुविधा दिलीपभाऊच्या टूर मध्ये मिळाल्या.त्यांनी यात्रेदरम्यान असे वातावरण निर्माण केले की, 93 जणांचे एक कुटुंबच तय्यार झाले. मी तर अतिशय जबाबदारीने लिहितो की, दिलीप भाऊ जगातील कोणत्याही व्यक्तीला व ग्रुपला सहज हॅन्डल करू शकतात. त्यांची नेतृत्व क्षमता, निर्णय क्षमता, हजरजबाबी पणा, वक्तृत्व अफाट आहे.कोणतीही गोष्ट पूर्णत्वाकडे कशी न्यायची हे भाऊकडून शिकले पाहिजे.संधी मिळाली तर भाऊ आयपीएल सारखे मोठे इव्हेंट सुद्धा यशस्वी करू शकतील. एक दिवस दिलीपभाऊ खुप मोठे होणार यात कुठलीही शंका नाही.

उद्धव केंद्रे – ही यात्रा भक्ती शक्ती आणि देशभक्तीची परिक्रमा होती.प्रत्येकाच्या मनात भोलेनाथाच्या दर्शनाची आस होती.वैष्णोदेवीच्या दर्शनाने तर परिक्रमाची शक्तीची स्फूर्ती मनात होती.वाघा बॉर्डरवर तर कोसळदार पाण्यात चिंब भिजत देशभक्तीचे निखारे वाहत होते.मन भारावून गेलो होतो.दिलीपभाऊ चे नियोजन तर अप्रतिम आम्ही आजपर्यंत दिलीपभाऊंना धर्मभूषण समाजसेवक एक मुरंबी राजकारणी समजत होतो पण हा भक्तीची नौका किनारा कडे घेऊन जाणारा नावाडी आहे…राजूभाऊ तर हजार जबाबी राम लक्ष्मणाची जोडी.
यात्रेत भोजनाची व्यवस्था समाविष्ट नव्हती तरीही एकही दिवस स्वतःचे जेवण करण्याची वेळ आली नाही.देशाच्या कानाकोपऱ्यात भाऊचा मित्रपरिवार विसावलेला आहे.भाऊचा मित्रपरिवारांचे हजारो हात अन्नदानासाठी सरसावले आणि आम्ही …तृप्तीचा ढेकर देत होतो.हे कार्य फक्त भाऊच करू शकतात.त्यांच्या कार्याला सलाम आहेअसेच कार्य भाऊच्या हातून हो ही प्रार्थना.येथून पुढे भाऊंच्या आयुष्याच्या सारीपाटावर येणाऱ्या सुखदुःखात आम्ही सहभागी होणार.जय भोले…..
पद्माकर केंद्रे, जि.प. सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी
अमरनाथ यात्रा अतिशय यशस्वीपणे पार पडली.आम्ही स्वगृही सुखरूप, सुरक्षित परतलो.या मागे दिलीप भाऊ ठाकुर यांचे अतिऊत्कृष्ट सुक्षम नियोजन,मागील २५ वर्षाचा दांडगा अनुभव,हाती घेतलेले काम प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी वाटेल ते करण्याची मानसिक तयारी,देशातील विविध राज्यांतील, विविध शहरांतील लोकांशी असलेले भावनिक संबंध , संपर्क.,दुसर्याच्या आनंदासाठी वाटेल ते कष्ट करण्याची तयारी, इतरांच्या आनंदात आपला आनंद मानणाराअवलिया व बाबा भोलेनाथावर असलेली अस्सीम श्रद्धा यामुळे आम्हाला अतिशय खडतर वाटणारी यात्रा अतिशय हसत खेळत कधी संपली हे कळलेच नाही. भाऊ कडे फक्त रेल्वे आरक्षण, राहण्याची सोय व पर्यटन क्षेत्राना भेट देण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्याची जबाबदारी होती.खाण्यापिण्याची व्यवस्था त्यांच्या कडे नव्हती.परंतु दिलीप भाऊ यांनी नांदेड हुन निघाल्यापासून परत येईपर्यंत दररोजचा सकाळचा नाश्ता, चहापाणी, दिवसातुन दोन ते तीन वेळेसच्या उत्तम जेवणाची व्यवस्था केली.एव्हढच नव्हेतर बाबा पान सुद्धा पुरवठा केला.एव्हढी चोख व्यवस्था दोन्ही करु शकत नाही. प्रवासात विविध मनोरंजक खेळ, गाण्यांच्या भेंड्या, स्पर्धेत सहभागी होणार यांच्या साठी बक्षीस ठेऊन बक्षीसाच्या रकमेतून सर्वना आईस्क्रीम उपलब्ध करून देणे.यामुळे यात्रा करावी तर दिलीप भाऊ सोबत.अशी भावना प्रत्येक यात्रेकरुंची झाली आहे.
अतिशय खडतर वाटणारी यात्रा अतिशय यशस्वीपणे पूर्ण होण्याचे कारण म्हणजे मागील तीन महिन्यां पासून सकाळचे morning walk, सामुहिक योग प्राणायाम, चालण्याची स्पर्धा आयोजित केली होती याशिवाय जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सर्वाना सहभागी होणे compalsary केले होते शिवाय रत्नेक्ष्वरी २० किलोमीटरची पदयात्रा आयोजित करून आम्हाला यात्रेसाठी मानसिक व शारीरिक दृष्ट्या सक्षम करुन घेतल्या मुळे यात्रा यशस्वी झाली . याकामी राजु भाऊ, सुभाष देवकयते यांचे कष्ट व परिश्रम नाकारता येणार नाही
दत्ता खानझोडे,विजय नगर नांदेड
जय भोले,अतिशय खडतर असलेली अमरनाथ यात्रा भाऊच्या उत्कृष्ट नियोजनामुळे अतिशय सुंदर झाली. संपूर्ण यात्रे मध्ये मला व माझ्या पत्नीला कुठलाही त्रास झाला नाही. अमरनाथ यात्रे सोबत आम्ही काश्मीर सहल सुध्दा झाली.काश्मीरला आम्ही पहिल्यांदाच येऊन श्रीनगर, सोनमर्ग, गुलमर्ग व जम्मू या ठिकाणी भेटी दिल्या. श्रीनगर मध्ये हाऊस बोट मध्ये राहता आले.त्या ठिकाणी शिकारा मध्ये फिरण्याचा आनंद घेतला. भाऊंनी संपूर्ण यात्रेचा शेवट अतिशय गोड केला. त्यांच्यामुळेच आम्हाला राष्ट्रपती भवन बघता आले. मी भाऊचे खूप खूप अभार मानतो.भाऊला 51 वेळा अमरनाथचे दर्शन घेण्याचे बळ ईश्वर देवो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
डॉ.संग्राम हिंगोले
4 जुलै ते 17 जुलै 25(14 दिवस ) धर्म भुषण दिलीप भाऊ व त्यांच्या टीमच्या योग्य नियोजन,वेळोवेळीचे मार्गदर्शन,प्रत्यक्ष कृती,याचा मेळ घातल्यामुळे यात्रा यशस्वी झाली.सर्वजण सुखरुप घरी पोहोचलेत. प्रवासात दिलीप भाऊ व राजु भाऊ यानी सांगीतलेले अनुभव, जोक्स, गाणे,गेम या मुळे वेळ कसा गेला हे कळलेच नाही.या प्रवासात प्रत्यक्ष अमरनाथ व वैष्णोदेवीचे स्थानाचे वातावरणात एक वेगळाच अनुभव आला.या देवस्थानाच्या महतीमुळे अनेकांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटला.त्याशिवाय निसर्गाचा अभ्यास करायला मिळाला. बालताल या बेस कॅम्पची परीस्थीती,अमरनाथची अवघड वाट,श्रीनगरचे शिकारा,दल लेक राईड,शंकराचार्यचे समाधीस्थळ ,गुुलमर्गचा गंंडोला राईड, सैनिकासी झालेला संवाद,जम्मूची महाकाली,चीची देवी दर्शन, अमृतसरचे गोल्डन टेंपल,वाघा बाॅर्डरची अंगावर शहारे आणणारी परेड हे सर्वच एक वेगळाच अनुभव देऊन गेले. दिल्लीतील इंंडीया गेट,राष्ट्रपती भवन हे पाहुन देशा बद्दलचा अभिमान द्विगुणित झाला.वाटेत जेवणाची, नाश्ता,हॉटेलची सोय फारच छान होती.जेवनाचा समावेश पॅकेजमधे नव्हता.पण आम्हाला जेवणासाठी एकही पैसा खर्च करावा लागला नाही.आमचा अनुभव असा आहे की,टुरला जायचे असेल तर भाऊ ट्रॅव्हल्स बरोबरच जा.धन्यवाद
शंकर कासाटवार,नायगाव
कालची जी आमची 25 वी अमरनाथ यात्रा झाली,तिच्याबद्दल बोलायचं झालं म्हणजे आमच्या आयुष्यात 53 वर्षात आलेला हा पहिला योगायोग म्हणावा लागेल.भाऊंनी आम्हाला जसे श्रावण बाळ काशीला आपल्या आई-वडिलांना घेऊन जातो तसे भाऊंनी आम्हाला 93 लोकांना घेऊन सुखरूप आणले.असेच आयुष्यात त्यांच्या हातून सत्कर्म घडत राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो व त्यांच्या आयुष्यात भरपूर यशाचे जावो ल तसेच राजूभाऊ बद्दल बोलायचे म्हणजे ते संयमी व मनमिळाऊ स्वभावाचे आहेत.त्यांना पण परमेश्वर प्रगतीच्या शिखरावर नेऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली.
अमरसिंह चव्हाण नांदेड
काफी सालोंसे मेरी ईच्छा थी की,अमरनाथजी के दर्शन करे.इस बार वो योग मुझे मिला. अगर आपको अमरनाथ यात्रा करनी है तो दिलीप भैय्या के सिवाय कोई पर्याय नही. जितने भी लोगों को अमरनाथ यात्रा करने की इच्छा हो तो दिलीप भैय्या के साथ ही अमरनाथ यात्रा करे.दिलीप भैय्याने बहुत सारे लोग इस अमरनाथ यात्री संघ के द्वारा जोडे है.ऊनका कहना है की दिलीपभैय्या के शिवाय अमरनाथ यात्रा पुरी नही हो सकती.दिलीप भैय्या को शतशः नमन !
चंद्रशेखर मुंढे – गेल्या चार महिन्यापासून आपण दिलीप भाऊ च्या नेतृत्वाखाली अमरनाथ यात्रेची तयारी करीत होतो चालण्याचा सराव, वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम, चालण्याच्या स्पर्धा इत्यादी पूर्वतयारी त्यांनी करून घेतली. ग्रुपमध्ये कोण कोण आहेत याची माहिती नव्हती मोजके दहा लोक सोडले तरी इतर कोण आहे ते माहित नव्हतं.परंतु पुढे पुढे सर्वांच्या ओळखी व्हायला लागल्या.सर्वांशी नाते जुळली दिवस कसे गेले समजले नाही. आम्ही सोबत जे खाण्यासाठी पदार्थ घेतले होते ते बाहेर काढण्याची गरजच भासली नाही.अवघे 14 दिवस कसे गेले हे आम्हाला कळले देखील नाही. आम्ही खूप आनंदाने यात्रा केली. यापुढे सुद्धा भाऊंनी जर दुसरी कुठली यात्रा काढली तर निश्चितच आम्ही भाऊ बरोबर प्रवास करू भाऊंना पुढील कार्यासाठी शुभेच्छा !
विनायक किन्होळकर,वसमत
माझ्या आयुष्यात अमरनाथ यात्रा होईल की नाही याची मला शंका होती,परंतु ही माझी अमरनाथ यात्रा केवळ दिलीपभाऊ मुळे पार पडली. योगायोग असा की भाऊला आमच्या सूर्यवंशी साहेबांनी फोन केला आणि केवळ पंधरा मिनिटात भाऊंनी संमती दर्शविली.भाऊचे नाव मी आज पर्यंत ऐकून होतो. राजकारणात भाऊंचे चांगले नाव आहे. प्रत्यक्ष भेट व्हायचा योगायोग फार चांगला आला. पाच माणसं सांभाळणे अत्यंत कठीण असते परंतु भाऊंनी 93 लोकांना व्यवस्थित रित्या,कोणाची अडचण न येता,कोणालाही त्रास न होता यात्रा पूर्ण केली.त्याबद्दल भाऊचे मी आभार मानतो .शेवटी असे म्हणतो “दोन दिवसाची रंगतसंगत । दोन दिवसाची नाती । अशी पाखरे येती । आणि स्मृती ठेवूनी जाती ।“
दत्ता शंकरराव पावडे,विजयनगर नांदेड
भाऊसोबत आमची पहिलीच यात्रा आहे .आम्ही त्यांच्याबद्दल जास्त काही बोलत नाही.भाऊचे आभार मानावे तितके कमी आहेत. आमचे मन भरून आलेले आहे. भाऊमुळे चांगले झाले असे आम्ही वारंवार त्यांना सांगत आलेलो आहोत. यापुढेही भाऊंनी कुठलिही यात्रा काढली तर निश्चितच आम्हाला सांगावे आम्ही त्यांच्याबरोबर जाण्यास उत्सुक आहोत.
मीनाक्षी संग्राम हिंगोले – अमरनाथ यात्रेला जायचे म्हणून आम्ही भाऊच्या मागे लागलो होतो. आम्ही पुण्याहून जाणार होतो पण भाऊच्या मुळे नांदेड वरून जाण्यासाठी आम्ही परावृत्त झालो. मेडिकल सर्टिफिकेट साठी भाऊची खूप मदत झाली. भाऊचे व्यवस्थापन रेल्वेमध्ये जातेवेळी प्रवासात आनंददायी वातावरण, जेवणाची खाण्याची सोय व्यवस्थित आहे, वयस्कर माणसं सुद्धा त्यांच्याबरोबर जाऊ शकतात असं त्यांचं मार्गदर्शन आहे. अमरनाथच्या कठीण प्रसंगात सुद्धा त्यांनी आमच्या व्यवस्थेकडे लक्ष दिले.रस्त्यात व बालटालला लंगर तर आहेतच परंतु त्या लंगर मध्ये आम्ही प्रसाद घेतला की नाही याची काळजी भाऊंना होती. पाण्याची व्यवस्था, महिलां व वृध्दांकडे कडे विशेष लक्ष इत्यादी बाबीमुळे यात्रा करावी तर भाऊ बरोबर !
सौ. कल्पना संगेवार – या यात्रेचे नियोजन दिलीपभाऊनी खुपच सुंदर केलेले आहे. संभाव्य अडचणींचा पुरेपूर अभ्यास करून काय नियोजन करायला पाहिजे हे आम्हाला शिकायला मिळाले. भाऊंनी अशी फळी निर्माण केली की आम्हाला कुठेही त्रास झाला नाही. खरोखर या अमरनाथ यात्रेची भीती सर्व दूर पसरलेली आहे. नातेवाईकामध्ये सुद्धा याची भीती जाणवत होती. परंतु भाऊच्या नियोजनामुळे सर्व भीती दूर झाली व कौटुंबिक व आनंददायी वातावरणात ही यात्रा संपन्न झाली. एकमेकाबद्दल आदर, जिव्हाळा निर्माण झाला.एकमेकांची काळजी कशी घ्यावी ,एकमेकांबद्दल प्रेम कसं वाढावं हे शिकायला मिळाले. आपण सर्व 93 लोक एका कुटुंबातील आहोत ही भावना निर्माण करण्यामागे दिलीपभाऊंचा मोठा हात आहे. दिलीपभाऊंचे खूप आभार.
वंदना सूर्यवंशी – माझी यापूर्वी भाऊ बरोबर गंगासागर यात्रा झालेली आहे .त्या अनुभवातून ही यात्रा सुद्धा चांगली होणार याची खात्री होती. एवढं नियोजन आम्ही आतापर्यंत कुठेच पाहिले नाही.भाऊनी 93लोक सोबत घेऊन नियोजनबध्द पद्धतीने ही यात्रा संपन्न केली. त्यांच्यामागे एक दैवी शक्ती आहे असं मला वाटते. आम्हाला कुठेही खाण्यापिण्याची कमतरता भासली नाही. आमच्यापैकी कोणीही आजारी पडले नाही. आम्ही जेवढे औषध बरोबर नेले होते ते सगळे औषधे जशास तसे वापस घेऊन आलो. ही यात्रा खूप चांगली झाली. भाऊचे खूप खूप धन्यवाद.
प्रा.अजयकुमार संगेवार – अमरनाथ यात्रेच्या निमित्ताने खूप काही शिकायला पाहायला व अनुभव मिळाले. अतिशय खडतर समजली जाणारी ही यात्रा दिलीप भाऊ व त्यांच्या टीमने सुकर तसेच सुखकर केली. मला असे जाणवले की,दिलीपभाऊ जवळ एक गुप्त रिमोट आहे.ज्याचा वापर ते टीम ला व यात्रेकरूंना शिस्तबद्ध व आनंदाने यात्रा घडवितात. दिलीपभाऊंनी अनेक दाते निर्माण केले.त्यांच्या शब्दातच अशी एक प्रेमळ धार आहे की कंजुष माणूस सुद्धा दानधर्म करण्यास प्रवृत्त होतो. खाण्यापिण्याची चंगळ सर्व ठिकाणी अगदी आरामाने दर्शन कुठेही घाई नाही चुकामूक नाही , नियोजनाची जेवढी स्तुती करावी तेवढी कमी. प्रत्येकाची तत्परतेने काळजी घेणारी ही जीवाभावाची माणसं थोड्याच दिवसांत आपुलकीने आपली कसे झाली हे कळलेच नाही. राष्ट्रपती भवनातील अनुभव हा यात्रेच्या आनंदाचा परमोच्च बिंदू होता. भाऊ तूम्हाला याबद्दल जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढं कमीच.
संजय प्रभाकर कलकोटे,काबरानगर नांदेड
भाऊ बरोबर याच्या अगोदर माझ्या चार टूर झालेल्या आहेत. गेल्या वर्षी मी अमरनाथला निघणार होतो परंतु वैयक्तिक अडचणीमुळे मी निघू शकलो नाही. या वर्षी जेव्हा भाऊचा संदेश आला ताबडतोब आम्ही तयारीला लागलो. भाऊंनी चालण्याची आणि योगाची जी प्रॅक्टिस घेतली त्यामुळे आमचे मनोबल वाढले. अमरनाथ यात्रेदरम्यान आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. याञे दरम्यान आम्ही लग्नाच्या वराडात असल्यासारखे वाटले भाऊंनी आम्हाला पालखीमध्ये नेलं आणि पालखीमध्ये आणले असा आम्हाला वाटलं. अल्योपहार, जेवण व पाण्याची व्यवस्था भाऊंनी खूप काळजीपूर्वक केलेली आहे. छान अनुभव आलेला आहे. कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. राजू भाऊ सोबत असल्याचे आम्हाला कळाल्यानंतर एक सुखद दुःख धक्का आम्हाला भेटला दोन भाऊ आमच्या सोबत असल्यानंतर आम्हाला भीती वाटण्याचं कारण नाही अशी आमची धारणा झाली. राजुभाऊंनी सुद्धा आमच्याकडे दिलीप भाऊ सारखीच काळजी घेतली. त्यामुळे राजु भाऊंचे व दिलीप भाऊंचे खूप आभार.
दुलाजी सुर्यवंशी – भाऊ बरोबर यात्रा करण्याची ही दुसरी वेळ आहे यापूर्वी मी भाऊ बरोबर गंगासागर ची यात्रा माझ्या परिवारासह व मित्रपरिवारासह केली होती. तो अनुभव आमच्या पाठीशी होता. या यात्रेत मी अजून दोन मित्र वाढवले व यात्रेसाठी आम्ही भाऊ बरोबर निघालो.भाऊचे काटेकोर नियोजन असल्यामुळे सर्व याञेकरुंची भाऊंनी घरच्या परिवारातील सदस्याप्रमाणे काळजी घेतली. भाऊची जी टीम आहे त्यात राजूभाऊ ठाकुर,सुभाष देवकते,सुरेश शर्मा यांनी न मागता आमची अल्पोपहार, पाण्याची, जेवणाची व्यवस्था नियोजनबद्ध पद्धतीने केली. बालटालला जेवणाची तसेच कोणीही आजारी पडणार नाही याची भाऊंनी पुरेपूर काळजी घेतली. त्यानंतर वैष्णोदेवीची यात्रा ही खडतर होती,परंतु उत्साहात वाजत गाजत भाऊंनी ही यात्रा पूर्ण केली. जे जे लिहिले ती सर्व स्थळे तर दाखविलीच, आणखी चिची देवीचे शक्तिपीठ दाखविले.श्रीनगर, गुलमर्ग, जम्मू येथे रघुनाथ मंदिर, सुवर्ण मंदिर, वाघा बॉर्डर ला स्पेशल पास घेऊन तेथील परेड आम्हाला दाखवली. याबद्दल भाऊचे आभार तसेच आमच्या जेवणाची अल्पोपराची सोय ज्या ज्या भक्तांनी केली त्या सर्वांचे इथे मी आभार मानतो आम्ही सुखरूपपणे परत आलो याबद्दल आम्ही भाऊंचे शतशः ऋणी आहोत.
सुनिता कलकोटे, काबरानगर, नांदेड
भाऊ बद्दल बोलायचं तर भाऊंनी कुठेही काही कमी पडू दिले नाही. भाऊसोबत गेल्यामुळे आम्ही पाळण्यात जाऊन पाळण्यात आल्यासारखे वाटले. एखाद दोन ठिकाणी अडचणी आल्या,परंतु भाऊ पाठीमागे असल्यामुळे त्या देवाने सांभाळलं. भाऊंचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ आहे ते सर्वांना समजून घेतात. दिलीप भाऊ, राजूभाऊ यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू व सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे त्यामुळेच आमची ही यात्रा सुखकर झाली.
माधव किशनराव बामणे
अमरनाथ याञेला जाण्या संदर्भात साधारण पाच वर्षापासून भाऊच्या संपर्कात होतो.परंतु मला रजाच मिळत नव्हती. यावर्षी प्रयत्न करून रजा घेतली. व अमरनाथ याञेसाठी निघालो. या याञेत अनेक अनुभव चांगले आले. हिंदू धर्मामध्ये अमरनाथ देवस्थान अत्युच्च स्थानावर आहे. अमरनाथ या तीर्थक्षेत्राला जाण्याचा भाऊ मुळे योग आला. वैष्णोदेवी व विविध पर्यटन स्थळ जसं दिल्ली, राष्ट्रपती भवन बघण्याचा योग या याञेत नसताना सुद्धा आला. सर्व मिळून एका कुटुंबासारखे यात्रेत राहता आले त्याचा खूप आनंद आहे.भाऊ चे खूप खूप आभार !
सुधाकर केंद्रे अहमदपूर
मी आज पवित्र अमरनाथ यात्रा पूर्ण करून परत येत आहे. मी यापूर्वी दोन यात्रा भाऊ बरोबर केलेल्या आहेत. जर एखाद्या यात्रेमध्ये आपण जर गेलो तर 90 टक्के जणांना पुन्हा त्यांच्याबरोबर जाणे नको वाटते.परंतु पुन्हा पुन्हा भाऊंच्यासोबत यात्रेत जावे असे फक्त भाऊच्या बाबतीत वाटते. आम्ही चारधाम यात्रे वरून परत येत असताना रस्त्यातच आम्हाला कळाले की ही यात्रा नैसर्गिक आपत्तीमुळे बंद झालेली आहे. तसेच यावेळेसही अमरनाथ यात्रा पुर्ण केल्यावर परत येत असताना भूस्खलनामुळे ही यात्रा स्थगित करण्यात आलेली आहे असे कळाले. म्हणजे यात्रेकरूंचे व्यवस्थित दर्शन होऊन ते सुखरूप घरी पोहोचावेत ही भाऊंची पुण्याई आहे. यावेळेस भाऊंनी नवीन उपक्रम हाती घेतला होता,तो म्हणजे यात्रेकरूमध्ये जे व्यसन आहे तंबाखू, सिगरेट वगैरे सोडण्याच्या दृष्टीने त्यांच मन परिवर्तन करण्यासाठी या दहा-बारा दिवसांमध्ये त्यांनी जे प्रयत्न केले,त्याच्यामुळे कमीत कमी चार-पाच जणांनी तंबाखूचं किंवा सिगरेटच सेवन सोडलेले आहे. हा ऊपक्रम यावर्षी भाऊंनी,खास करून राजू भाऊ आणि देवकते यांनी राबवल्या बद्यल मनापासून आभार. आम्ही याच्यानंतर पुढच्या यात्रेला आताच नियोजन केलेले आहे पशुपतिनाथ नेपाळसाठी. धन्यवाद !
सौ.विमलताई चव्हाण लोहा
मी दिलीपभाऊ कडे अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी केली.भाऊंना मी म्हणाले की,माझे वय 63 आहे मी या यात्रेला येऊ शकेन की नाही.परंतु भाऊने आधार दिला,माझ्या मनाची तयारी केली आणि मी यात्रेला निघाले. भाऊचे नियोजन बघितल्यानंतर खूप आनंद झाला. जेवण, अल्पोपहार, बिसलेरी पाणी याची व्यवस्था भाऊंनी मोफत केली.खूप भक्तीमय वातावरणात भाऊंनी ही यात्रा संपन्न केली. याबद्दल खूप आनंद आहे. माझ्यासारख्या वृद्ध व्यक्तीला सुद्धा आधार देऊन व्यवस्थित रित्या ही यात्रा पार करून मी परत जात आहे याचा मला खूप आनंद आहे. भाऊचे खूप खूप आभार.
अनिता बालाजी ढाकणे,अहमदपूर
भाऊ बरोबर माझी ही तिसरी यात्रा आहे.पहिली केदारनाथ यात्रा दुसरी गंगासागर यात्रा व ही तिसरी अमरनाथ यात्रा.शाळेच्या सुट्टीमुळे मला या यात्रेला जाण्याचे शक्य होत नव्हते. परंतु अमरनाथ बाबाचे बोलावणे आले त्यामुळे मला जाणे भाग पडले.नातेवाईकांनी खूप भीती दाखवली,नको जाऊस खूप खडतर यात्रा आहे .परंतु दिलीपभाऊ बरोबर जायचे म्हणून आनंद होता व विश्वास होता की,दिलीपभाऊ बरोबर ही यात्रा सुखकर होणार आणि म्हणून मी निघाले. राम-लक्ष्मणासारखे दिलीपभाऊ आणि राजूभाऊ हे दोघेही माझ्या पाठीशी उभे होते. यांच्यासोबत यात्रा करण्यासाठी खूप आनंद वाटला.ठरवलेली सर्व स्थळे पहावयाला मिळाली. त्याचबरोबर अल्पोपहार,जेवण,चहापाणी सर्व व्यवस्थित रित्या वेळेवर मिळत गेले.कोणाची तक्रार येणार नाही,कोणाची भांडणे होणार नाहीत याची पुरेपूर काळजी या दोघा बंधूंनी घेतलेली आहे .कुठलाही भेदभाव न ठेवता यात्रा कशी सफल करावी हे दोन्ही बंधूकडून शिकायला हवे.यापुढेही यांच्याबरोबर यात्रा करणे मला खूप आवडेल.
चित्रलेखा नारायण पांडे
मनामध्ये अमरनाथ भगवानाचे दर्शन घेण्याची इच्छा होती परंतु ते शक्य नाही असे वाटत होते.पण माझ्या मैत्रिणींमुळे हे शक्य झाले.लगेचच आम्ही भाऊंना फोन केला.भाऊंनी बुकिंग पूर्ण झालेली आहे असे सांगितले ,परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये काही जणांचे जाणे रद्द झाल्यामुळे आमचा जाण्याचा योग आला. भाऊंचे तीन महिन्यापासून चे नियोजन हे अमरनाथ यात्रा सुखकर होण्याचे गमक आहे असे मला वाटते.
ही यात्रा खरंच कठीण आहे परंतु मनाची इच्छाशक्ती असल्याशिवाय ही यात्रा पूर्ण होऊ शकत नाही. आम्ही पहिल्यांदाच या यात्रेला आलेलो आहोत,या यात्रेतील प्रत्येक ठिकाण पहिल्यांदाच पाहिलेले आहे.परंतु भाऊंच्या सुनियोजनामुळे आम्हाला या यात्रेचा पुरेपूर आनंद घेता आला.कठीण जरी असले तरी प्रत्येक गोष्टीचा,प्रत्येक दर्शनाचा आम्ही खूप खूप आनंद घेतलेला आहे.भाऊच्या नियोजनामध्ये अल्पोपहार चहा पाणी भोजन याची व्यवस्था अत्यंत सुनियोजित होती.भाऊ जवळ भेदभाव नव्हता.रोज बस मध्ये वेगळी बैठक व्यवस्था, खेळताना वेगवेगळे गट याद्वारे भाऊ ने नियोजन केलेले होते.या व्यवस्थेमुळे सर्वांशी संवाद साधता आला.नवीन मित्र मैत्रिणी भेटल्या,त्यांच्याशी जवळीकता झाली,ओळखी वाढल्या, त्याचे रूपांतर नात्यात झाले.भाऊ जवळ भेदभाव नसल्यामुळे सर्वांना समसमान वागणूक मिळाली.भाऊ सोबत असलेले राजूभाऊ ठाकूर, देवकतेजी ,सुरेश शर्मा यांनीही आम्हाला मदत केली.त्यामुळे भाऊ व भाऊ च्या टीमचे खूप खूप आभार
साईप्रसाद देविदासराव हळदे
यावर्षी मी दिलीप भाऊ ठाकूर यांच्यातर्फे आयोजित अमरनाथ यात्रेमध्ये सहभागी होतो. धर्मभूषण ही दिलीप भाऊंना दिलेली पदवी अगदी सार्थ आहे. कारण धर्मासाठी केलेले कार्य हे आम्ही पाहिले आहे. दिलीपभाऊ हे धर्मयोद्धा आहेत. अमरनाथ सारखी खडतर यात्रा हे दिलीपभाऊ शिवाय होऊ शकत नाही हे माझे ठाम मत आहे. दिलीपभाऊंचे शिस्तबद्ध नियोजन व सर्वांना आपलेसे करून घेणे हे गुण मला खूप भावलेले आहेत. भाऊंच्या मित्र प्रेमामुळे आम्हाला ज्या सुख सोयी मिळाल्या त्या अवर्णनीय आहेत.
सौ ज्योती व प्राचार्य डॉ. सुधीर शिवणीक
बऱ्याच जणांकडून अमरनाथ यात्रा करावी तर दिलीपभाऊ यांचे सोबत हे ऐकले होते. ज्यावेळेस दिलीप भाऊंचे अमरनाथ यात्रे संदर्भातले पत्रक पहावयास मिळाले.त्यावेळेस मी दिलीपभाऊंना फोन केला. दिलीपभाऊंनी सांगितले की,ताबडतोब नोंदणी करा.आम्ही नोंदणी केली व त्यानंतर अमरनाथ यात्रे संदर्भातली पूर्वतयारी सुरू झाली.चालण्याची सवय व्हावी यासाठी रोज सराव, प्राणायाम, मेडिटेशन याचा भाऊ सराव घ्यायचे. त्यानंतर अमरनाथ यात्रेकरूंची नोंदणी ही अत्यंत कठीण परंतु भाऊंनी ती लीलया करून घेतली. चालण्याच्या स्पर्धा, रत्नेश्वरी पायी दिंडी इत्यादी उपक्रम अमरनाथ यात्रे पूर्वी भाऊंनी राबवले.
यामागचा उद्देश म्हणजे अमरनाथ यात्रा सुखकर व्हावी हा होता.अमरनाथ यात्रेदरम्यान सुनियोजन, सुव्यवस्था, प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष, सर्वांचे मनोरंजन, वैयक्तिक अडचणीवर मात करण्यासाठी प्रयत्न, वैयक्तिक सुखदुःखात सहभाग या गोष्टी भाऊंनी जपल्या.अत्यंत सुनियोजित पद्धतीने ही यात्रा कोणत्याही यात्रेकरूला कुठल्याही प्रकारचा त्रास न होता सुखकर रीतीने पार पडली. याचे श्रेय दिलीपभाऊ ठाकूर, राजेशसिंह ठाकुर, श्री देवकते साहेब, व श्री सुरेश शर्मा यांना जाते.भाऊ व भाऊच्या टीमचे या सुनियोजित यात्रेसाठी खूप खूप आभार.
नारायण पांडे नांदेड – मी भाऊ सोबत पहिल्यांदाच तीर्थयात्रेला निघालो मी यापूर्वी कधीच समूहामध्ये तीर्थयात्रेला गेलो नाही मी वैयक्तिक किंवा एक दोन मित्राबरोबर फिरायला गेलो होतो परंतु एवढ्या मोठ्या समूहासोबत कधीच फिरायला किंवा तीर्थयात्रेला गेलेलो नाही भाऊ सोबत अमरनाथ तीर्थ



