नांदेडस्पोर्ट्स

State level Wrestling Competition ; श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त बिलोली येथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

बिलोली। श्री हनुमान जन्मोत्सव समिती आणि गावकरी मंडळ बिलोली यांच्या वतीने झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि विविध जिल्ह्यातून कुस्तीपटू सहभागी झाले होते प्रथम पारितोषिक 51 हजार रुपयांचे वाशिमच्या विजय शिंदे यांनी पटकावले तर द्वितीय पारितोषिक आटपाटीचे सचिन काळे यांनी पटकावले महिला कुस्तीपटू पूजा पवार आणि दिल्लीच्या रणजीत कौर या महिलेची कुस्ती रंगतदार ठरली.

दरवर्षी हनुमान जयंतीच्या अनुषंगाने कुस्तीच्या स्पर्धेत आयोजित करण्यात येत असत यावर्षी श्री हनुमान जन्मोत्सव समिती आणि गावकरी मंडळ यांच्या वतीने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धा बिलोली येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या प्रांगणात 13 एप्रिल रोजी सायंकाळी सुरू झाल्या आणि मध्यरात्रीपर्यंत या स्पर्धा चालल्या या राज्यातील विविध जिल्ह्यासह कानाकोपऱ्यातून महिला व पुरुष कुस्तीपटू सहभागी झाले होते प्रथम पारितोषिक 51 हजार रुपयांचे वाशीमच्या विजय शिंदे यांनी पटकावले दिल्ली येथून आलेल्या महिला कुस्तीपटू रणजीत कौर आणि पूजा पवार यांची कुस्ती रंगतदार ठरली.

सर्व श्री . बी पी नरोड, संतोष कुलकर्णी, यादवराव तुडमे, धोंडीबा शंखपाळे माली पाटील , दिलीप खंडेराय, गोविंद मुंडकर,किशन पटाईत ,अशोक खंडेराय ,पिराजी कल्याणकर ,अभिजीत तुडमे ,लाईख सिद्दखी, सचिन मामडे.,भिमराव जेठे मारोती पटाईत ,नागनाथ तुम्मोड.श्री अर्जुन अंकुशकर . शंकर भासकरे यशवंत गादगे , गंगाधर शिंदे, अशोक तुडमे अर्जुन खंडेराय ,शुभम गादगे , नृरसिंग मेघमाळे. शंकरराव शंखपाळे ,इंद्रजीत तुडमे ,साई अरगुलवार गंगाधार पापुलवार,सुनिल सुर्यवंशी ग्रामविकास अधिकारी हणमंत अंबेराव ,तानाजी गादगे डॉ मनोज शंखपाळे . आदि उपस्थिती होते.

IMG 20250418 WA0007 State level Wrestling Competition ; श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त बिलोली येथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

पारितोषिक वितरण उपक्रमात बी पी नरोड, संतोष कुलकर्णी,अभिजीत तुडमे, आदी व्यक्तींची भूमिका महत्त्वपूर्ण होती. तर सामन्यांचे पंच पै.श्री अर्जुन अंकुशकर ,पै.साहेबराव वानखेडे महाराष्ट्र चॅम्पियन ,पै.अमोल कंकाळ एन आय एस , माधव शंखपाळे व पै.यादव शंखपाळे यांनी पंच म्हणून उत्तम कार्य केले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!