श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे l अखिल भारतीय शिक्षक साहित्य, कला-क्रिडा मंडळ आयोजित राज्यस्तरीय शिक्षक ‘कराओके’ गीत गायन महाअंतिम सोहळा २०२५ माहूर येथे दि.२ मार्च २०२५ रोज रविवारला संपन्न होणार असून या महाअंतिम सोहळ्यात महाराष्ट्रातून सहा विभागातून निवड झालेले प्रत्येकी सात असे एकूण ४२ स्पर्धक सहभागी होणार आहेत.


गतवर्षी संगमनेर येथे हा महाअंतिम सोहळा संपन्न करण्यात आला होता.पण यावेळी हा यजमान पदाचा बहुमान माहूरला मिळाला आहे.यासाठी अखिल भारतीय शिक्षक साहित्य,कला-क्रिडा मंडळ मराठवाडा विभाग यांच्या आयोजनात हा सोहळा संपन्न होणार आहे.त्यासाठी श्री.आनंद दत्त धाम आश्रम श्रीक्षेत्र माहूरगड हे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे.


या महाअंतिम सोहळ्यातील सुरांच्या मैफिलीस कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दिलीप कुमार बनसोडे शिक्षण अधिकारी जि.प नांदेड हे असतील. तर उद्घाटक म्हणून सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर हे असणार आहेत.तसेच बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष अ.भा.सा.क.क्री. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नटराज मोरे हे असणार आहेत.


त्याच बरोबर या सोहळ्यात प्रमुख उपस्थितीती फिरोज दोसानी नगराध्यक्ष माहूर, विवेक कांदे मुख्याधिकारी माहूर, गंधाली पवार मुख्याधिकारी नायगाव, शिवप्रकाश मुळे पो.नि.माहूर,राजू जाधव संगितकार माहूर,भारत कोडापे संगीत तज्ञ,सुरेश पाटील संगीत तज्ञ अदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.या वेळी हर्षल साबळे,प्रकाश पारखे,नरेंद्र कनाके,तानाजी आसबे, बाबाराव डोईजड, रमेश मुनेश्वर, बिभीषण पाटील, शेषराव पाटील, सुनिता येवले,ज्योती राणे,विद्या शिर्के,उत्तम कानिंदे,मिलिंद जाधव,रुपेश मुनेश्वर व गणेश लेंगरे या सर्व विभागीय अध्यक्ष तथा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभणार आहे.

यापूर्वी गतवर्षी याच संस्थेमार्फत शिक्षक साहित्य संमेलन माहूर येथे संपन्न झाले होते.त्याच्या यशानंतर शिक्षक गायन स्पर्धेचा महाअंतिम सोहळा इथे होतो आहे.ही सर्व रसिक प्रेक्षकांसाठी एक वेगळी मेजवानीच असेल.तसेच प्रत्येक वेळी शिक्षकांना निश्चित व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश सफल होताना निश्चितच हा सोहळा प्रेरणादायक होईल, असे गौरवोद्गार आनंद दत्त धाम आश्रमाचे मठाधिपती द.भ.प.साईनाथ महाराज वसमतकर यांनी काढले असून या स्पर्धेस शुभेच्छाही दिल्या आहेत.


