किनवट, परमेश्वर पेशवे| श्रीनिवासा ऑटोमोटिव्ह्सच्या टीमला त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले आहे. सणासुदीच्या काळात टार्गेट पूर्ण केल्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. हा पुरस्कार सोहळा परभणी येथील द फर्न रेसिडेन्सी येथे आयोजित करण्यात आला होता.


या सोहळ्यात श्रीनिवासा ऑटोमोटिव्ह्सला झोनल सेल्स हेड (वेस्ट झोन) श्री. विनीत, एरिया सेल्स मॅनेजर (नागपूर) श्री. ब्रिजॉन आणि राइडवेल मोटर्स, नांदेड येथील श्री. कमल कोठारी यांच्या हस्ते पुरस्कार श्रीनिवास ऑटोमोटिव्ह चे संचालक श्रीनिवास नेम्मानिवार यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार 2024-25 या वर्षातील उत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात आला आहे.


श्रीनिवासा ऑटोमोटिव्ह्सच्या टीमने सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करून आपली कर्तव्यदक्षता सिद्ध केली आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या पुरस्कारामुळे टीमचा उत्साह वाढला असून, भविष्यातही अशीच उत्कृष्ट कामगिरी करण्याचा त्यांचा मानस आहे.
