उस्माननगर, माणिक भिसे l देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजीं यांच्या वाढदिवसा निमित्ताने नमोनेत्र संजिवनी स्वास्थ्य अभियान ही मोहीम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने कंधार तालुक्यातील उस्माननगर येथे उत्तरचे मंडळाध्यक्ष बालाजी पाटील पांडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सिद्धेश्वर मंदिरात नमो नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन दि.२६ सप्टेंबर रोज शुक्रवार ह्या दिवशी आयोजित करण्यात आले होते. या दरम्यान २८५ रुग्णांनी नेत्राची तपासणी करून भरभरून साथ दिली.


यावेळी कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून सुरूवात करण्यात आली . या कार्यक्रमास लोहा तालुका भाजपचे अध्यक्ष शरद पवार, कंधारचे शहराध्यक्ष पिंटू यन्नावार , नागोराव मोरे, मनोज शिरसे , गोविंदराव वारकड,सतीश आनेराव,विश्वंभर मोरे ( पोलीस पाटील),आनंदराव किडे , संजय वारकड, ग्रामसेविका शिंदे , अमिनशहा फकिर, दत्ता भाऊ कारामुंगे, दत्ता शेट्टे, बाबुराव शेकापुरे,गोविंद कपाळे ,पोकले हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी सभापती तथा उत्तरचे भाजपाचे मंडळाध्यक्ष बालाजी पांडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे युगपुरुष देशाचे कणखर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी बालाजीराव पांडागळे बोलत असताना पुढे म्हणाले की,समाजसेवेचे व्रत घेऊन भारतीय जनता पार्टी काम करत असते.जनताभिमुख काम करणे हे भारतीय जनता पार्टीचे ब्रीदवाक्य आहे. आरोग्य क्षेत्रातील अडचणी किंवा सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता त्यांना मोफत औषध उपचार मिळण्याच्या उद्देशाने हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.


अनेक रुग्णांना शासनाच्या वतीने मोफत उपचार मिळत आहे गोरगरिबांना उपचार देऊन सदृढ भारत निर्मितीचा वसा पक्ष राबवत आहे तसेच “पक्ष माझा स्वाभिमान, पक्ष माझा अभिमान, पक्ष माझा श्वास आणि पक्ष माझा विश्वास “या ध्येयाने कार्यकर्ते काम करत असून जनतेच्या मनातील पक्षावरचा विश्वास अधिक दृढ करण्याचे काम अशा प्रकारच्या उपक्रमाच्या माध्यमातून होत असते,जनतेशी नातं जोडण्याचं मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून केले जाते असे गौरवोद्गारही बालाजीराव पांडागळे यांनी यावेळी काढले. यावेळी शरद पवार ,गंगाप्रसाद यन्नावार व डाॅ. गजानन कुरुंदकर यांनी मार्गदर्शन केले.

या शिबिरात लायसन्स क्लब नेत्र रूग्णालयात नांदेड येथील डॉ. गजानन कुरुंदकर व डाॅ. राजू पिडगे यांनी २८५ रूग्णांची नेत्र तपासनी केली यामध्ये मोतीबिंदू झालेले ५० रूग्ण व डोळ्यावर पडदा आलेले ०५ रूग्ण निघाले या ५५ रूग्णाना नेत्र शस्त्रक्रिया करण्यासाठी लायसन्स क्लब नेत्र रूग्णालय येथे पाठविण्यात आले आहे .ही शस्त्रक्रिया मोफत होत आल्यामुळे रूग्ण समाधान व्यक्त करीत आहेत.
या शिबिराचा फायदा ग्रामीण भागातील जनतेला मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे असे उद्गार बालाजी पांडागळे यांनी काढले आहे. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी अशोक पाटील काळम, कमलाकर पाटील शिंदे ,दत्ता पाटील घोरबांड, अमिनशाह फकिर, अमजद पठाण, सुमित लाठकर, सोमनाथ काळम , पांडुरंग होळगे,अंकुश काळम, गंगाधर भिसे, राम वारकड, अंगुलिकुमार सोनसळे, शिवप्रसाद साखरे आदीनी परिश्रम घेतले.या नमो नेत्र तपासणी शिबिरास उस्माननगर , शिराढोण , तेलंगवाडी, भुत्याचीवाडी , लाठ खुर्द , दाताळा सह परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला.


