Namonetra camp ; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उस्माननगर येथे नमोनेत्र शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद २८५ रूग्णांनी नेत्र तपासणी
उस्माननगर, माणिक भिसे l देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजीं यांच्या वाढदिवसा निमित्ताने नमोनेत्र संजिवनी स्वास्थ्य अभियान ही मोहीम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने कंधार तालुक्यातील उस्माननगर येथे उत्तरचे मंडळाध्यक्ष बालाजी पाटील पांडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सिद्धेश्वर मंदिरात नमो नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन दि.२६ सप्टेंबर रोज शुक्रवार ह्या दिवशी आयोजित करण्यात आले होते. या दरम्यान २८५ रुग्णांनी नेत्राची तपासणी करून भरभरून साथ दिली.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून सुरूवात करण्यात आली . या कार्यक्रमास लोहा तालुका भाजपचे अध्यक्ष शरद पवार, कंधारचे शहराध्यक्ष पिंटू यन्नावार , नागोराव मोरे, मनोज शिरसे , गोविंदराव वारकड,सतीश आनेराव,विश्वंभर मोरे ( पोलीस पाटील),आनंदराव किडे , संजय वारकड, ग्रामसेविका शिंदे , अमिनशहा फकि...
