उस्माननगर, माणिक भिसे| तेलंगवाडी रोडवरील मोहम्मद मुसा मोहम्मद दाऊद शेख यांच्या शेतातील गट क्रमांक ६३ मधील सौर उर्जेचे प्लेट दि . २२ मे २०२५ रोजी आलेल्या चक्री वादळ वाऱ्याने उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे.


उस्माननगर ते तेलंगवाडी रोडवरील मोहम्मद मुसा मोहम्मद दाऊद शेख यांचे शेत असून शेतामध्ये स्थापित करण्यात आलेल्या सौर कृषी पंपा ( स्पॅन कंपनी) चे दि.२२ मे २०२५ दरम्यान सायंकाळी अचानक आलेल्या चक्री वादळी वाऱ्यामुळे खुप मोठे नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यामुळे एकुण संचातील आठ सौर पॅनल ( प्लेट) अक्षरशः उन्मळून पडल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.


ग्रामीण भागात विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत असते. रात्री अपरात्री शेतकऱ्यांना मिळविण्यासाठी मोटार लावण्यासाठी ये जा करावे लागत असे. शासनाकडून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीला पाणी वेळेवर मिळावे यासाठी सौर ऊर्जा पॅनल देण्यात आले. शेतकऱ्यांची धावपळ थांबविण्यासाठी शेतकऱ्यांनी विहिरीवर कृषी पंपा सौर उर्जेचे प्लेट बसविले आहे. पण मागिल आठवड्यात उस्माननगर परिसरात अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे सोलर पॅनल कोलमडून पडल्याने कृषी पंप बंद पडले आहे.


शेतातील उभे पिक पाण्याअभावी करपून जात आहे. गुरढोराना पाणी पाजविण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने हवालदिल झाला आहे. परिणामी महसूल प्रशासने तात्काळ नुकसाणीचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी संबंधित विभाकडे शेतकऱ्यांनी केली आहे.



