श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। रेणुका देवी मंदिर पायथ्याशी असलेल्या परशुराम मंदिराकडे जाणाऱ्या वळणावर दि. ३० च्या मध्यरात्री २ वाजुन ५ मिनिटाला अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगीर येथिल सहा युवकांच्या महिंद्रा कंपनीच्या एम एच २७ डि यु ११४० या कारला विचित्र अपघात घडला असुन गाडी ने जम्प घेत चार हि चाके वर झाले नशिब बलवत्तर म्हणून यातील सहा ही प्रवासी बालंबाल बचावले.


श्री रेणुका देवी मंदीरा कडून माहुर शहराकडे येणाऱ्या येत असतांना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने परशुराम मंदिराकडे जाणाऱ्या वळणावर वळण न घेता कार सरळ जात जवळपास १० फूट उंच हवेत उडाण घेऊन जंगल भागात आदळुण अपघात घडला आहे. या अपघातात सर्व भाविक बाल-बाल बचावले घटनास्थळी कोणीही नसल्याने अपघात ग्रस्तानी गाडी बाहेर येऊन ११२ वर फोन करून माहुर पोलिसांना बोलाविले.


पोलीसांनी तात्काळ घटनास्थळ गाठुन गाडीतील सौरभ महेंद्र मरोडकर वय २७, आकाश गजानन खालकोने वय २८, सुयोग सुरेंद्र चव्हाण वय २८, रोशन शरदराव मरोडकर वय ३३, अक्षय प्रमोद हळदे. वय २७ व भूषण संदीपराव पिंपळे वय २५ यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ अक्षय वाठोरे यांनी प्रथमोपचार केले सर्व भाविक सुखरूप आहेत.



