नांदेड l तालुक्यातील पंचक्रोशीतील नवसाला पावणारी खव्याती असलेल्या श्री सत्याआई देवी नवरात्र महोत्सव कांकाडी ता,जि. नांदेड 22 सप्टेंबर पासून सुरू वात झाली असुन दैनंदिन धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून 22 सप्टेंबर रोजी घटस्थापना,श्री सत्याआई देवीचे विधीवत पूजन 1 ऑक्टोबर होमहवण,2 रोजी देवीची पालखी व दैनंदिन पुरणपोळीचे नैवैद्य आयोजित करण्यात आले आहे.


पंचक्रोशीतील नवसाला पावणारी देवी खाव्याती असलेल्या काकांडी येथील जागृत देवी श्री सत्यआई देवी पुढे पूर्वी शेकडो बकऱ्यांचा बळी जायचा. पशुहत्येची प्रथा श्री संत तनपुरे महाराज पंढरपुरकर यांनी बंद करून देवीला पुरण पोळीचा नैवद्य सुरु केला व गावकऱ्यांना तुळशीमाळा घालून पशुहत्येपासून मुक्त केले. पुढे ही देवी नवसाला पावणारी म्हणून प्रसिध्दीस आली.

आजही प्राचीन काळापसून श्री सत्यआई देवीची यात्रा दर तीन वर्षानी भरते,परिसरातील सुहासिनी बाई-लेकी देवीला पुर्वी बकऱ्याचा बळी देणाऱ्या आता पुरण पोळीचा नैवद्य चढवून खण नारळांनी ओटी भरून मनोकामना पूर्ण करतात. केलेला नवस पूर्ण करण्यासाठी आजही देवीला सोने चांदीचे पाळणे वाहतात,अशी ही नवसाला पावणारी श्री सत्यआई देवीची महोत्सवा निमित्ताने विविध सामाजिक व सांस्कृतिक प्रभोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेदि. 22 सप्टेंबर ते 02 ऑक्टोंबर पर्यंत नवरात्र महोत्सवात विविध सांस्कृतीक धार्मिक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.


दि. 22 सप्टेंबर रोजी विधीवत घटस्थापना व श्री सत्यआई देवीचे पुजन तसेच दररोज सकाळची आरती ही सत्यआई देवी नवरात्र महोत्सव समिती व देवीचे मानकरी यांची असेल,या महोत्सवा काळात दैनंदिन पुराण पोळी नैवैद्य यजमान यांच्या हस्ते महा आरती व महाप्रसाद वाटप करण्यात येते, 2 ऑक्टोबर रोजी विजया दशमी दसरा निमित्ताने देवीच्या पालखी गावातुन मिरवणूक काढण्यात येणार आहे. या सत्याआई महोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रमांत मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समस्त गावकरी मंडळी कांकाडी यांनी केले आहे.


