HomeनांदेडThe decoration ceremony of Shri Parameshwara was completed with grandeur : श्रीकृष्ण...

The decoration ceremony of Shri Parameshwara was completed with grandeur : श्रीकृष्ण जन्माष्टमी तथा चौथ्या श्रावण सोमवारी श्री परमेश्वराचा अलंकार सोहळा थाटात संपन्न -NNL

हिमायतनगर,अनिल मादसवार। संबंध भारतात प्रसिद्ध असलेल्या हिमायतनगर वाढोणा येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरात आज दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोज श्रीकृष्ण जन्माष्टमी तथा चौथ्या श्रावण सोमवारी श्री परमेश्वर मूर्तीला सुवर्ण अलंकाराणे सजविण्यात आले असून, हजारो भाविकांनी रात्री 10 वाजेपर्यंत श्री परमेश्वराचं अलंकार स्वरूपात दर्शन घेऊन पुण्य प्राप्त केलं आहे. मध्यरात्रीला भजन कीर्तन होऊन रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्मष्टमी साजरी करण्यात आली.  यावेळी श्री परमेश्वर भजनी मंडळाच्या महिला पुरुष वारकरी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी दिली आहे.

हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिर अंदाजे सव्वा सातशे वर्षाहुन अधिक जुने असुन, सामाजिक, धार्मिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या या मंदिराला इतिहासकालीन महत्व प्राप्त झाले आहे. या मंदिराच्या दगडी शिळा याची साक्ष देणारी असून, त्यामुळेच मागील काळात श्री परमेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. हेमाडपंथी उत्तराभीमुख मंदिरातील भुयारातील गाभा-यात शिवशंकर – विष्णुच्या अवातारातील हरीहर रुपातील श्री परमेश्वराची उभी मुर्ती आहे. अत्यंत देखणी व सर्वांग सुंदर श्री परमेश्वराची मुर्ती काळ्या पाशानात घडवीलेली असून, परम अधिक इश्वर म्हणजेच परमेश्वर हे देवाधीदेव या मूर्तीच्या निरीक्षणातून दिसून येतात असे जुने जाणकार सांगतात.

IMG 20240826 215959 The decoration ceremony of Shri Parameshwara was completed with grandeur : श्रीकृष्ण जन्माष्टमी तथा चौथ्या श्रावण सोमवारी श्री परमेश्वराचा अलंकार सोहळा थाटात संपन्न -NNL
 

हिमायतनगर वाढोणा शहरातील श्री परमेश्वराच्या मुर्तीचे वर्णन किंवा या मुर्तीशी अन्य देवतांच्या मुर्तीशी साम्य असणारे वर्णण कुठेही आढळुन येत नाही. त्यामुळे हि मुर्ती भारतात एकमेव मुर्ती असल्याचे या मंदिरास भेट दिलेल्या अनेक संत महंत आणि जुने जाणकार, जेष्ठ नागरिक सांगगत. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा श्री परमेश्वर आहे असे मानणारे विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश व ईतर भागातील भक्त दर्शनासाठी महाशिवरात्रीला आणि श्रावण मासात येत असतात.

IMG 20240826 230941 The decoration ceremony of Shri Parameshwara was completed with grandeur : श्रीकृष्ण जन्माष्टमी तथा चौथ्या श्रावण सोमवारी श्री परमेश्वराचा अलंकार सोहळा थाटात संपन्न -NNL
 

दरवर्षीप्रमाणे यंदा श्री परमेश्वर मंदिरात श्रावण मास उत्सव मोठ्या हर्षोल्हासात साजरा केला जात असून, ७१ वर्षानंतर सोमवार पासून श्रावण मासाला सुरुवात होऊन सोमवारीच श्रावण मासाचा समारोप होतो आहे. विशेषतः या महिन्यात पाच सोमवार येत असल्याने हरिहर रूपातील श्री परमेश्वर दर्शनाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. हा अद्भुत आणि दिव्य योग साधून श्रावण महिन्यात बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांच्या नेतृत्वाखाली ओम नमः शिवाय अखंड नामजाप सुरु करण्यात आला आहे. २१ दिवसध्या काळात शिवपुराण कथा, संत ज्ञानेश्वर माऊलींची गाथा संपन्न झाली असून, भागवत कथेला तीन दिवस लोटले असून, दररोज दुपारी २ ते ५ या वेळेत भागवत पुराण कथा हभप. कु. वैष्णवी दीदी गौड यांच्या मधुर वाणीतून सांगितली जाते आहे.

IMG 20240826 134218 The decoration ceremony of Shri Parameshwara was completed with grandeur : श्रीकृष्ण जन्माष्टमी तथा चौथ्या श्रावण सोमवारी श्री परमेश्वराचा अलंकार सोहळा थाटात संपन्न -NNL

श्रावण महिन्याच्या काळात भाविकांना श्री परमेश्वराचे महाशिवरात्री प्रमाणे अलंकारमय दर्शन घडावे या उद्देशाने दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोज श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून पुरोहित कांतागुरु वाळके यांच्या मंत्रोच्चारात श्री परमेश्वर मूर्तीचा अलंकार सोहळा दुपारी १२ नंतर पोलीस बंदोबस्तात थाटात संपन्न झाला. येथील सुवर्णकार बाबुराव सकवान यांनी श्री परमेश्वर मूर्तीला अलंकाराने सजविण्याचे कार्य केले. त्यानंतर श्रीची महाआरती करून भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले. अलंकार सोहळ्यातील श्री परमेश्वर मूर्तीचे हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेऊन डोळ्याचे पारणे फेडले आहे. यावेळी श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंतराव देवकते, प्रकाश शिंदे, प्रकाश कोमावार, राजाराम झरेवाड, वामनराव बनसोडे, लताताई पाध्ये, लताताई मुलंगे, मथुराबाई भोयर, एड.दिलीप राठोड, अनिल मादसवार, संजय माने, गजानन मुत्तलवाड, विलासराव वनखेडे, लिपिक बाबुराव भोयर गुरुजी, मायंबा होळकर, संतोष गाजेवार, संतोष वानखेडे, रामराव पाटील कार्लेकर, पंडित ढोणे, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments