श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। महाराष्ट्र लोकसेवा आयोगा 2022 च्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून माहूर येथील शिवम सुरेश गिऱ्हे याने १६१ व्या रॅंक क्रमांक पटकावित पोलिस उप निरीक्षक पदास गवसणी घातली.


शिवम याचे प्राथमिक शिक्षन माहूरला झाले असुन पुढील शिक्षण सैनिक शाळा वाशिम माध्यमिक व उच्च माध्यमिक म. गाधी विघालय अहमदपुर व कृषी अभियांत्रिकी पदवी शिक्षण जळगाव येथील उल्हास पाटील येथे पुर्ण केले. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी पुणे येथे करून स्पर्धा परिक्षा दिली. या परिक्षेत मुलाखती साठी १३०० शे पैकी १६१ वा रॅंक घेऊन यश संपादन केले. त्याच्या या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.




