Wednesday, May 13

Former MLA Pradeep Naik : माजी आमदार प्रदीप नाईक यांनी गाव भेटीवर दिला जोर जनतेचा वाढता प्रतिसाद – NNL

शिवणी, भोजराज देशमुख| विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहिर होऊ शकतात तरी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी चिन्ह हे गाव,वाडी, तांडावर जाऊन लक्षात आणुन द्या असे माजी आमदार प्रदीप नाईक साहेब यांनी शिवणी परिसरातील व्यंकटापुर, अप्पारावपेठ,शिवणी येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतेवेळी सांगितले.

IMG 20240807 WA0050 Former MLA Pradeep Naik : माजी आमदार प्रदीप नाईक यांनी गाव भेटीवर दिला जोर जनतेचा वाढता प्रतिसाद - NNL

माजी आमदार प्रदीप नाईक यांनी गाव,वाडी, तांडावर भेटी गाठीला जोर दिला असुन जनसामान्य जनतेतुन वाढता प्रतिसाद मिळत असतांना दिसुन येत आहे. आज दि 6 अगस्ट रोजी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी शिवणी परिसरातील व्यंकटापुर, अप्पारावपेठ, शिवणी,गोंडजेवली, दयाल धानोरा येथे भेटी देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला यावेळी माजी आमदार प्रदीप नाईक म्हणाले विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहिर होऊ शकतात तरी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी चिन्ह हे गाव, वाडी, तांडावर जाऊन लक्षात आणुन द्या असे प्रतिपादन केले.

IMG 20240807 WA0051 Former MLA Pradeep Naik : माजी आमदार प्रदीप नाईक यांनी गाव भेटीवर दिला जोर जनतेचा वाढता प्रतिसाद - NNL

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड, अनिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय कोवे,राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी आघाडीचे रामा उइके , ज्योतीबा गोणारकर ,सभापती शिवाजीराव पाटील घोगरे, शिवराम जाधव, गणपत राठोड,मनोज राठोड,प्रकाश जाधव, डॉ गंगासागर,पेटाजी कट्टलवाड,सुभाष राठोड ,डॉ बाबुराव राठोड,माजी सरपंच उतम नानु राठोड ,भोजराज देशमुख,संतोष जाधव, संचालक शेख जब्बार तल्लारीकर, साखरे कोसमेट, सरपंच बाडु उरे, संचालक दासु तोडावार दिगाबर बोंदरवाड, गंगाधर पाटील आडसींसह अनेकांची उपस्थिती होती.

IMG 20240807 WA0052 Former MLA Pradeep Naik : माजी आमदार प्रदीप नाईक यांनी गाव भेटीवर दिला जोर जनतेचा वाढता प्रतिसाद - NNL

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!