नांदेड। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय जवानांनी पाकिस्तान मध्ये घुसून केलेल्या कारवाईच्या समर्थनार्थ आणि भारतीय जवानांना सलाम करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आज नांदेडमध्ये तिरंगा मोटरसायकल रॅली काढण्यात आली. भीज पावसात काढण्यात आलेल्या तिरंगा मोटरसायकल राहिलेला प्रचंड प्रतिसाद मिळाला . भारत माता की जय च्या घोषणानी अवघे नांदेड शहर दणाणले.


शिवसेना उपनेते तथा मंत्री विधानपरिषद गटनेते आमदार ना. हेमंतभाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आ. आनंदराव पाटील बोंढारकर व आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी जुना मोंढा येथून प्रचंड उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यात आली.


यावेळी उपस्थित संपर्कप्रमुख दत्तात्रय पईतवार,शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे, जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे, सुहास बालाजी कल्याणकर, जिल्हासंघटक शंकर पिनोजी, सहसंपर्कप्रमुख स.दर्शनसिंघ सिध्दू, उपजिल्हाप्रमुख बिल्लु यादव, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कऱ्हाळे, विधानसभाप्रमुख अशोक उमरेकर, शहरप्रमुख तुलजेश यादव, शहरप्रमुख सुहास खराणे पाटील, शहरप्रमुख श्याम कोकाटे, शहरप्रमुख संतोष माधनवाड, तालुकाप्रमुख अशोक मोरे, तालुकाप्रमुख मारोती पंढरे, मा.नगरसेवक स.संदीपसिंघ गाडीवाले, महानगरप्रमुख राजू गुंडावार, मंगेश कदम, युवासेना जिल्हाप्रमुख आमोदसिंघ साबळे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.वनमला राठोड,



जिल्हाप्रमुख सौ.गीता पुरोहित, सौ.अपर्णा नेरलकर, दिपा थोरवड , लता शेळके,आम्रपल्लवी शिंदे,अवतारसिं पहिरेदार, बालाजी भायेगावकर, सुदिन पाटील,बालाजी सपुरे,महेश तिडके,विजय यादव,लड्डूसिंघ काटकर,गब्बु तिवाना,सचिन पोपळे,सचिन जरीकोट,सचिन पवार,पै.रामेश्वर काळे,मारोती धुमाळ, गजेंद्र ठाकूर,धम्मा कदम, गणेश आप्पा,कुवचन यादव,श्याम बन, शहाजी पाटील,राजेश चव्हाण,महेश नागेलीकर, विकास देशमुख, गणेश बोकारे,गब्बू बोकारे,धनु पावडे, श्याम पाटील वानखेडे,दिगंबर मटकमवार, साहेबराव वानखेडे, पवन शिंदे, पप्पू गायकवाड, पप्पू सोनटक्के, संतोष खांडेकर, नवनाथ काकडे यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते, देशभक्त मोठ्या संख्येने तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते.

पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तर पाकिस्तान मध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करणाऱ्या भारतीय जवानांना शिवसेनेच्या वतीने सलामी देण्यात आली आहे . भविष्यातही भारत अशा कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला बळी पडणार नाही. जे कोणी भारताविरुद्ध वाकडी नजर करतील त्यांना जशास तशी उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य खंबीर आहे. त्यामुळे संपूर्ण भारतीयांनी आपल्या सैन्याला पाठबळ देण्यासाठी आणि त्यांच्या शौर्याच्या समर्थनासाठी मैदानात उतरण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
प्रकृती स्वास्थ्यामुळे आ. कल्याणकर रुग्णालयात दाखल
भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीसाठी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आ. बालाजीराव कल्याणकर यांनीही नियोजनात सहभाग घेतला होता. नांदेड उत्तर भागातून जास्तीत जास्त शिवसैनिक आणि देशप्रेमी नागरिक या रॅलीत सहभागी होतील यासाठी ही त्यांनी परिश्रम घेतले मात्र गेल्या दोन दिवसापासून त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्यावर नांदेड मधील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे ते तिरंगा रॅलीत प्रत्यक्ष सहभागी होऊ शकले नाहीत अशी माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.


