देगलूर, गंगाधर मठवाले| अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना एकरी २५.हजार रुपये अनुदान पिक विमा कर्ज माफी घरपडी त्वरीत देण्यात यावे अन्यथा शिवसेना उध्व बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ११ सप्टेंबर रोजी नवीन बस स्थानक नांदेड हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर तीव्र रासता रोको आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारयासह प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


अधिक माहिती असे की देगलूर तालुक्यात आगस्ट महिन्यात तबल दोन वेळा सतत अतिवृष्टीमुळे शेतकरी बाधवानी निसर्गाच्या भरवशावर उसनवारी करून महागामोलाचे बियाणे खते कीटकनाशके खरेदी करून खरीप पिकाची लागवड केली होती.

पण कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ शेतकर्यांच्या नशिबी सटविने पाचविला पुजलेल्या अलिखित लिहुन ठेवलेल्या नशिबी नुसार निसर्गाच्या नेहमीच्याच दुष्ट चक्रामुळे हातातोंडाशी आलेले पिके नष्ट झाल्यात जमा झालेली आहेत गेल्या पाच वर्षा पासून ओला दुष्काळ पडला असल्याने शेतकरी राजा कर्ज बाजारी आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे आत्महत्या सारख्या अघोरी कॄत्य करीत आहेत.



यावर्षीच्या अतिवृष्टी मुळे सुध्दा खरीप पीक भुईसपाट होवून गेले अतिवृष्टीचया यादीतून हणेगाव प्रशासनाने वगळण्यात आले असल्याने हणेगाव विभागातील शेतकरी बाधवाना अन्याय होत असल्याची खत व्यत केल्या जात आहे तरी हणेगाव विभागातील शेतकरी बाधवाना सुध्दा एकरी २५ हजार रुपये अनुदान देण्याची मागणी केली आहे.

देगलूर तालुक्यातील सर्व शेतकर्यांना पीक विमा देण्यात यावे पीक कर्ज माफ करावे अशी मागणी करणारे निवेदन जिल्हा अधिकारी यांना देण्यात आले असून या मागणीसाठी शिवसेना उध्व बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अकरा सप्टेंबर रोजी देगलूर नवीन बसस्थानक नांदेड हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर तीव्र रासता रोको आंदोलन करण्यात येईल याची नोंद घेऊन त्वरीत उपाययोजना करण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन शिवसेना तालुका प्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापुरकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले आहे.
यावेळी महेश पाटील मुखेड शिवसेना तालुका प्रमुख उमेश पाटील आडलूरकर शहर प्रमुख संजय जोशी शहर प्रमुख रवि उल्लेवार भागवत पाटील सोमुरकर युसूफ भाई मिस्त्री राजू उल्लेवार बाबुराव मिनकीकर राहुल सोनकांबळे आशा मोठ्या संख्येने उपस्थित होते

