देगलूर, गंगाधर मठवाले | शहापूर आगस्ट महिन्यात दहा दिवसांत दोन वेळेस आलेले पुराचे पाणी शहापूर व नरगल मंडळातील शेतीचे नुकसान झाले असून याची दखल घेऊन खासदार डॉ अजित गोपछडे यांनी शहापूर परिसरात पूरग्रस्ताची पाहणी करण्यासाठी आले असता तत्काळ मदत मिळवून देण्याची मागणी भाजपचे तालुका उपाध्यक्ष तथा तमलुर ग्रामपंचायत चे सदस्य शिवराज हाडे यांनी केले आहे.


शहापूर व नरगल मंडळातील तमलुर शेळगांव शेवाळा नदूर शेखापुर आलूर सागवी उमर मेदनकलूर थडीसावरगाव मडगी कुरुडगी या गावाचा आलेल्या पुरामुळे सपर्क तुटला होता अतिवृष्टी होवो अथवा न होवो.



पण उशाला वरिल भागात असलेल्या धरणामुळे उदा निझामसागर शिगूर डॅम लेडी प्रकल्प माजरा लिबोटी धरन आश अनेक छोट्या मोठ्या महाराष्ट्र तेलंगणा व कर्नाटक तील धरणात पाणी साठा जास्त झाला कि अचानक धरणातून पाणी,सोडले जाते धरणाच्या अतिविशाल पाण्यामुळे नदी पाञा सोडून शेतातून वाहते अनेकदा पुर्व सुचना नसल्याने शेतकर्यांच्या पिकाचे तर नुकसान होतेच त्यासोबत माती सुध्दा वाहुन जाते शहापूर व नरगल महसूल मंडळात अतिवृष्टी होवो न होवो.


नदीला धरणाचे पाणी सोडले की शेतीचे होणारे नुकसान ग्रहित धरून शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात यावे शेताला जाणारे रस्ता पुराच्या पाण्यामुळे वाहुन गेले आहेत त्या तत्काळ दुरुस्ती करावे असे वेगवेगळे जनतेच्या हिताचे मागणी खासदार अजित गोपछडे म याच्या कडे शिवराज हाडे तमलुर कर यांनी केले आहे.




