हिमायतनगर। तालुक्यातील पोटा बु. येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या प्रवक्त्या सौ. संजनाताई घाडी यांचा सत्कार करण्यात आला. संजनाताई घाडी ह्या स्त्री शक्तीचा जागर या कार्यक्रमानिमित्त नांदेड जिल्ह्य़ांच्या दौर्यावर आहेत.
माहूर येथील शक्तीपीठ रेणुका माता दर्शनासाठी त्या जात असताना दि. २६ मौ. पोटा बु. येथे शिवसैनिकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारा प्रसंगी सौ. संजनाताई घाडी म्हणाल्या की, महाराष्ट्र शासनाने लाडकी बहिण योजना सुरू केली. परंतू राज्यात दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत. ही बाब अतिशय दुर्दैवाची ठरते, आणी म्हणून शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने पेक्षा महिलांची सुरक्षितता महत्वाची असून, शासनाने आता मुख्यमंत्री माझी सुरक्षित बहिण ही योजना राबवावी. जेणेकरून महिला सुरक्षित राहतील. अशी टिका प्रवक्त्या सौ. संजनाताई घाडी यांनी सत्कार सोहळ्या दरम्यान सरकारवर केली. शिवसैनिकांनी आगामी विधान सभा निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे. असे अवाहनही सौ. संजनाताई घाडी यांनी केले.
यावेळी मुंबई महानगर पालिकेच्या नगरसेविका सोनमताई जामसुदकर, हिंगोली जिल्हा महिला आघाडीच्या संघटिका प्रियंकाताई घानेकर, माजी सरपंच संतोष पुलेवार पोटेकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. अश्विनीताई पुलेवार, युवासेना उपजिल्हाप्रमुख किशन फटाले, महिला आघाडी तालुका प्रमुख शिल्पाताई राठोड, युवती सेना जिल्हा समन्वयक प्राजक्ताताई गुंडेकर,संदिपराव देशमुख, गजानन सुर्यवंशी, माजी सरपंच अशोक जाधव, पत्रकार आनंद जळपते, बाळू खडके, विशाल अललवाड, माजी उपसरपंच राम गुंडेकर, विलास माने, अहेमद मिस्त्री, इब्राहिम शेख, सुर्यवंशी आदिंची प्रामूख्याने उपस्थिती होती.