देगलूर (गंगाधर मठवाले) शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री मा. श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना मराठवाडा संपर्कप्रमुख माजी विरोधी पक्षनेते मा. श्री अंबादास दानवे, नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख मा. श्री बबनराव थोरात, जिल्हा प्रमुख मा. श्री भुजंग पाटील तसेच सहसंपर्कप्रमुख मा. श्री दयाल गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली देगलूर येथे आज (दि. 9 ऑक्टोबर) तहसील कार्यालयासमोर भव्य आंदोलन करण्यात आले.


ओला दुष्काळ घोषित करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान द्यावे, पीककर्ज माफ करावे, तसेच पीकविमा मंजूर करावा, या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने तहसीलदार भरत सुर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.


या आंदोलनादरम्यान तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, तालुकाप्रमुख बालाजी पाटील इंगळे (खुतमापुरकर), शहरप्रमुख संजय जोशी, विधानसभा प्रमुख पांडुरंग पाटील, जिल्हा समन्वयक नागनाथ वाडेकर, शहर संघटक भगवान जाधव, युवासेना तालुका प्रमुख तथा सोशल नेटवर्कर प्रमुख भागवत पाटील सोमुरकर, उपशहरप्रमुख बाबुराव मिनकीकर, युवा शहर संघटक संतोष कांबळे, विभाग प्रमुख सुभाष खुनेवाड माळेगांवकर आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक, युवासैनिक, शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी शिवसेना नेहमीच लढा देत राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.




