हिमायतनगर| राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाची हिमायतनगर येथे संघटनात्मक आढावा बैठक संपन्न होऊन काही निवडी करण्यात आल्या. यामध्ये राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या जिल्हा सचिवपदी गोविंद शिरफुले तर हिमायतनगर तालुकाध्यक्ष पदी आकाश सुर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे.


यावेळी राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी, जिल्हा कार्याध्यक्ष बंटी पाटील जोमदे, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे हिमायतनगर तालुकाध्यक्ष सुनिल पतंगे, प्रभाकर मुधोळकर, जिवन जैसवाल, राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे शहराध्यक्ष शेख मुस्सा, दक्षिण तालुकाध्यक्ष पांडुरंग क्षिरसागर, अर्धापुर तालुकाध्यक्ष गजानन लढे, सुमित भरणे, अमोल कुरमे, प्रदिप धुमाळे, गजानन गोरख यांची उपस्थिती होती. निवड झाल्याबद्दल दोघांचेही अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
