श्रीक्षेत्र माहुर राज ठाकूर| माहुर या मतदारसंघात बंजारा समाज मोठ्या प्रमाणात असून बंजारा समाज हा निर्णायक आहे, महाराष्ट्रात जिथे जिथे बंजारा समाज मोठ्या प्रमाणात आहे त्या मतदार संघात अखिल भारतीय बंजारा युवा संघटनेचे कार्यकर्ते चाचपाणी सर्वेक्षण करत असून आपल्या समाजाचा उमेदवार “तो कोणत्याही पक्षाचे काम करत असेल” कशा प्रकारे निवडून येईल व समाज मनाचा कौल जाणून घेत आहे.
सघटनेचे जनरल सरचिटणीस प्रतिकसिंग नाईक (चव्हाण) यांनी राज्यातील किनवट विधानसभा मतदासंघासह पाच मतदारसंघात सर्वेक्षण करून समाज मनाचा कौल जाणून घेतला आहे.व अखिल भारतीय बंजारा युवा संघटनेच्या वतीने किनवट विधानसभा मतदारसंघासाठी शरद राठोड (भाजपा )यांनी उमेदवारी घ्यावी असे विनंती पत्र राठोड यांना दिले आहे. महाराष्ट्रात बंजारा समाजाचे अनेक नेते आहेत, परंतु अखिल भारतीय बंजारा युवा संघटनेने एक गोपनीय सर्वेक्षण केले आहे, ज्यामध्ये प्रत्येक पक्षाच्या बंजारा संभाव्य उमेदवारांची निवड करण्यात आली आहे , तुम्ही समाजातील लोकांना न्याय दिला आहे, बंजारा समाजाच्या हितासाठी नवीन नेतृत्वाची गरज लक्षात घेऊन आम्ही अखिल भारतीय बंजारा युवा संघटनेच्या वतीने किनवटमधून निवडणूक लढवावी,अशा आशयाचे पत्र शरद राठोड यांना दिले आहे.
तसेच भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना हि सघटनेचे जनरल सरचिटणीस प्रतिकसिंग नाईक (चव्हाण) यांनी पत्र दिले असून राज्यातील किनवट विधानसभा मतदारसंघ. भाजपची उमेदवारी शरद राठोड यांना घ्या आम्ही तुम्हाला सर्वतोपरी पाठिंबा देऊ. बंजारा समाजाचा वर्षानुवर्षे छळ होत असून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी शरदचंद्र राठोड सारख्या तरुणाला किनवट विधानसभेत उमेदवारी देऊन समस्त बंजारा समाज आपला सदैव ऋणी राहील अशी विनंती नाईक यांनी दि.१ ऑगस्ट रोजी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रातून घोषित केले आहे.
पं.स.माहुरचे माजी सभापती शरद राठोड हे उच्च विद्याविभूषित असून मितभाषी म्हणून सर्वदूर परिचित आहेत.पक्षासाठी त्यांची निष्ठा वाखाण्याजोगी तर आहेच,शिवाय समाजासाठी त्यांचे योगदानही उल्लेखनीय आहे.ही बाब जाणून भाजप नेतृत्वाने त्यांना उमेदवारी रुपात संधी द्यावी असा आग्रह संघटनेने धरला आहे.शरद राठोड यांनी भाजपाचा सामान्य कार्यकर्ता ते भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष पदाची धुरा प्रभावीपणे सांभाळली आहे. प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. या सर्व बाबींचा पक्षाला मोठा फायदा होणार आहे,असे मत अखिल भारतीय बंजारा युवा संघटनेने पत्रातून व्यक्त केले आहे.