HomeनांदेडA run safety mini marathon competition : नांदेड शहरात एक धाव सुरक्षेची...

A run safety mini marathon competition : नांदेड शहरात एक धाव सुरक्षेची मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात -NNL

नांदेड| जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ज‍िल्‍हाधि‍कारी कार्यालय, नांदेड व महाराष्‍ट्र राज्‍य आपत्‍ती व्यवस्थापन प्राध‍िकरण, महसूल व वन, मदत व पुनर्वसन आपत्‍ती व्‍यवस्‍थापन विभाग मंत्रालय मुंबई यांच्या तर्फे आयोजित महसूल पंधरवडाचे औचित्य साधून एक धाव सुरक्षेची-Run For Safety या उपक्रमांतर्गत नांदेड येथे मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली.

या स्पर्धेला निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे यांनी सहभागी स्‍पर्धक – युवक युवतीना आपत्‍तीमध्‍ये बचाव कसा करावा बाबत मार्गदर्शक केले व मॅरेथॉनला ह‍िरवा झेंडा दाखवून ज‍िल्‍हाध‍िकारी कार्यालय, नांदेड येथून स्पर्धेची सुरुवात केली. या मॅरेथॉन स्पर्धेचा छ. श‍िवाजी महाराज पुतळा, एस.पी.ऑफीस, आय.टी.आय. कॉर्नर व्‍हीआयपी रोड मार्गे ज‍िल्‍हा क्रिडा संकुल येथे समारोप झाला. विविध आपत्ती संदर्भात युवक व युवतींमध्ये जनजागृती व्हावी आणि त्यांनी सुरक्षिततेचे नियम पाळावे या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ज‍िल्‍हयातील एन.एस.एस.,एन.सी.सी., स्‍काऊट व गाईड, होमगार्ड, व‍िवि‍ध र्स्‍पोर्ट अॅकडमी, आपदा मित्र, महसूल व‍िभागाचे अध‍िकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. श्रीन‍िकेतन वि‍द्यालय, एन.एस.बी. कॉलेज, सायन्‍स कॉलेज, प‍िपल्‍स कॉलेज, यशवंत कॉलेज, आय. टी. एम. कॉलेज, जवाहर महाव‍िदयालय,वसंतराव नाईक कॉलेज, म.फुले कॉलेज मुखेड सह नायगांव, अर्धापुर सह ज‍िल्‍हयातील शाळा कॉलेजच्‍या व‍िदयार्थ्‍याने मोठया उत्‍साहात सहभाग घेतला होता.

या मॅरेथॉन मध्‍ये मुलीमध्‍ये प्रथम तेजस्‍वीनी संघरत्‍न कांबळे, द्वितीय आर्या भगवान दुथडे, तृतीय रंजना रमेश यादव व मुलामध्‍ये प्रथम र‍ितेश साहेबराव टोमके, द्वि‍तीय परमेश्‍वर सुर्यकांत रामापुरे, तृतीय लक्ष्‍मण दत्‍ता राठोड व‍िजेते ठरले. सायन्‍स कॉलेल व एन.एस.बी.कॉलेजच्‍या व‍िदयार्थानी चांगली कामगीरी केली.

ही मॅरेथॉन यशस्‍वी करण्‍यासाठी अभ‍िजीत राऊत मा.ज‍िल्‍हाध‍िकारी तथा अध्‍यक्ष ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राध‍िकरण नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली महेश वडदकर न‍िवासी उपज‍िल्‍हाध‍िकारी तथा मुख्‍य कार्यकारी अध‍िकारी, किशोर कुऱ्हे, ज‍िल्‍हा आपत्‍ती व्यवस्‍थापन अध‍िकारी यांच्‍या न‍ियोजनाखाली ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्रभागाचे महसूल सहायक बारकुजी मोरे यांनी सर्व व‍िभागाशी समनव्‍य ठेवून मॅरेथॉन यश्‍स्‍वी करण्‍याचा प्रयत्‍न केला.

ज‍िल्‍हा क्रीडा अध‍िकारी, जयकुमार टेंभरे यांच्‍यासह ज‍िल्‍हा क्रीडा अध‍िकारी कार्यालयाचे अध‍िकारी, कर्मचारी, कोच व गणेश मुंढे -चौरंग मार्फत मॅरेथॉन स्‍पर्धेचे परीक्षण केले. यावेळी मल्‍लि‍कार्जुन करजगी- संचालक एन.एस.एस. स्‍वामी रामानंद ति‍र्थ मराठवाडा व‍ि‍द्यापीठ, एस.डी.आर.एफ. चे पोलीस निरीक्षक पी.एस. रुपदास सोनवणे, होमगार्डचे वरीष्‍ठ पलटन नायक शेख बसीरोद्दीन, बळवंत आटकोरे, शंकपाळे, आदीसह व‍िव‍िध शाळा महाविदयालय,एन.एस.एस,एन.सी.सी.,स्‍काऊट गाईड, होमगार्ड, एस.डी.आ.एफ.आपदा मित्र संबंधीत अध‍िकारी, कर्मचारी , प्राध्‍यापक, श‍िक्षक व कोच यांची उपस्‍थ‍िती होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments