A run safety mini marathon competition : नांदेड शहरात एक धाव सुरक्षेची मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात -NNL
नांदेड| जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड व महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महसूल व वन, मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन विभाग मंत्रालय मुंबई यांच्या तर्फे आयोजित महसूल पंधरवडाचे औचित्य साधून एक धाव सुरक्षेची-Run For Safety या उपक्रमांतर्गत नांदेड येथे मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली.
या स्पर्धेला निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे यांनी सहभागी स्पर्धक - युवक युवतीना आपत्तीमध्ये बचाव कसा करावा बाबत मार्गदर्शक केले व मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवून जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथून स्पर्धेची सुरुवात केली. या मॅरेथॉन स्पर्धेचा छ. शिवाजी महाराज पुतळा, एस.पी.ऑफीस, आय.टी.आय. कॉर्नर व्हीआयपी रोड मार्गे जिल्हा क्रिडा संकुल येथे समारोप झाला. विविध आपत्ती संदर्भात युवक व युवतींमध्ये ...
