Sharad Rathod ; शरद राठोड यांनी किनवट/ माहूर विधानसभा लढवावी- अखील भारतीय बंजारा युवा संघटना – NNL
श्रीक्षेत्र माहुर राज ठाकूर| माहुर या मतदारसंघात बंजारा समाज मोठ्या प्रमाणात असून बंजारा समाज हा निर्णायक आहे, महाराष्ट्रात जिथे जिथे बंजारा समाज मोठ्या प्रमाणात आहे त्या मतदार संघात अखिल भारतीय बंजारा युवा संघटनेचे कार्यकर्ते चाचपाणी सर्वेक्षण करत असून आपल्या समाजाचा उमेदवार "तो कोणत्याही पक्षाचे काम करत असेल" कशा प्रकारे निवडून येईल व समाज मनाचा कौल जाणून घेत आहे.
सघटनेचे जनरल सरचिटणीस प्रतिकसिंग नाईक (चव्हाण) यांनी राज्यातील किनवट विधानसभा मतदासंघासह पाच मतदारसंघात सर्वेक्षण करून समाज मनाचा कौल जाणून घेतला आहे.व अखिल भारतीय बंजारा युवा संघटनेच्या वतीने किनवट विधानसभा मतदारसंघासाठी शरद राठोड (भाजपा )यांनी उमेदवारी घ्यावी असे विनंती पत्र राठोड यांना दिले आहे. महाराष्ट्रात बंजारा समाजाचे अनेक नेते आहेत, परंतु अखिल भारतीय बंजारा युवा संघटनेने एक गोपनीय सर्वेक्षण केले आहे, ज्यामध्ये प्रत्...
