सोलापूर l कलावंतांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेल्या पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी शाहीर बाळू सीतासावर कंदलगावकर यांची निवड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे कामारीकर यांच्या आदेशान्वये पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष शाहीर बापूराव जमदाडे यांनी नियुक्ती पत्र पारंपारिक लोककला संवर्धन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे कामारीकर गंगाधर सोनकांबळे गायिका चंदा सूर्यवंशी मारुती चितोरे संविधान जमदाडे अनुष्क जमदाडे यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात केली आहे.


शाहीर बाळू सीतासावर यांचे सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कार्यात मोठे योगदान आहे त्या दृष्टीने त्यांनी कलावंताच्या एकजुटी करिता प्रयत्न करावे तसेच सोलापूर जिल्ह्यात गाव तिथं पारंपारिक लोककला संवर्धन मंडळाच्या शाखा स्थापन करून कलावंतांचे संघटन मजबूत करावे याकरिता पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे यांच्या सूचनेनुसार शाहीर बापूराव जमदाडे यांनी शाहीर बाळू सीतासावर यांची निवड केलेली आहे शाहीर बाळू सीतासावर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे कलाकार व मित्रमंडळी कडून कौतुक होत आहे




