नवीन नांदेड़| पतंजलि योगपीठ परिवाराच्या वतीने बालाजी मंदिर आनंदसागर सोसायटी सिडको येथे 9 ते15 डिसेंबर पर्यंत चालणार असून योगगुरु अनिल अमृतवार बालाजी वारकड यांच्या वतीने शिबीराचा सहभागी नागरीकांना योगासने शिकविण्यात येणार आहेत.
पतंजलि योगपीठाच्या वतीने 9 ते15 डिसेंबर पर्यंत हे योगशिबिर सकाळी 5 वाजता आयोजन करण्यात आले .शिबिर उद्धाटन प्रसंगी प्रथम दीपप्रज्वलन करण्यात आले ,यावेळी बालाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अरुण दामकोंडवार महाराष्ट्र भाजपा ओबीसी प्रदेश सचिव तथा आनंदनगर सोसायटीचे अध्यक्ष संतोष वर्मा, माजी नगरसेविका बेबिताई जनार्धन गुपिले, डॉ सुरेखा अशोक कलंत्री यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी योग शिक्षक शैलेश पालदेवार ,विभावरी देशमुख ,राखी भंडारी,भास्कर पोधाडे ,सतीश कवटिकवार ,अंबिका अमिलकंठवार यांचे स्वागत करण्यात आले, या योगशिबिरास जास्तीत जास्त साधकांनी हजर राहण्याचे आवहान पंतजलि योग पीठाच्या वतीने करण्यात आले आहे.