लोहा| महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अधिकारी लोह्याचे भूमीपुत्र क अमोल बालाजी चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित शालेय साहित्यांचे वाटप व शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. हा शैक्षणिक उपक्रम दहा पेक्षाअधिक शाळेत व गावात राबविण्यात आला. युवा नेते स्वाराती विद्यापीठाचे सिनेट सदस्य नवनाथ (बापू ) चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवछत्रपती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात अमोल चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त शालेय साहित्य व वृक्षारोपण करण्यात आला ते शाळेचे माजी विद्यार्थी आहेत.


शाळेचे मुख्याध्यापक दामोधर वडजे, माजी नगरसेवक संभाजी चव्हाण , शिक्षक पत संस्थेचे व्हाईस चेअरमन हरिभाऊ चव्हाण, भारत पाटील पवार, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एच, जी. पवार याची प्रमुख उपस्थिती होती. शाळेतीत पहिली ते दहावी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना वह्या -पेन। वाटप करण्यात आले. तसेच शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.


युवा नेते नवनाथबापू चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच अमोल यांच्या कार्याचे कौतुक केले. मुख्याध्यापक दामोधर वडजे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एच. जी. पवार, ज्येष्ठ शिक्षक आर. आर. पिठठलवाड यांनी शाळेचे माजी विद्यार्थी अमोल चव्हाण यांना आशिर्वाद देताना त्यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. संचलन बालाजी गवाले यांनी केले सर्व शिक्षक वृद मित्रपरिवार तसेच नागनाय चव्हाण ,महेश चव्हाण, साई चव्हाण, साई जामगे, गजानन दांगटे यासह मित्र परिवार उपस्थित होते.


मुकदम वाचनालया समोर वृक्षारोपण
अमोल चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्ताने कै देवराव मुकदम सार्वजनिक वाचनालया समोर सिनेट सदस्य नवनाथ बापू चहाण- हरिभाऊ चव्हाण यांच्या हस्ते कल्पवृक्ष लावण्यात आले. वायनालयाच्या सचिव बालिका क्षीरसागर-अन्नकाडे यांनी मान्यवरांचा सत्कार केला, शहरातील तसेच खेड्यातील वेगवेगळ्या शाळेत वाढदिवसाच्या निमित्ताने शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण करण्यात आले.


