बँक अधिकारी अमोल चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण – NNL
लोहा| महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अधिकारी लोह्याचे भूमीपुत्र क अमोल बालाजी चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित शालेय साहित्यांचे वाटप व शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. हा शैक्षणिक उपक्रम दहा पेक्षाअधिक शाळेत व गावात राबविण्यात आला. युवा नेते स्वाराती विद्यापीठाचे सिनेट सदस्य नवनाथ (बापू ) चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवछत्रपती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात अमोल चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त शालेय साहित्य व वृक्षारोपण करण्यात आला ते शाळेचे माजी विद्यार्थी आहेत.
शाळेचे मुख्याध्यापक दामोधर वडजे, माजी नगरसेवक संभाजी चव्हाण , शिक्षक पत संस्थेचे व्हाईस चेअरमन हरिभाऊ चव्हाण, भारत पाटील पवार, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एच, जी. पवार याची प्रमुख उपस्थिती होती. शाळेतीत पहिली ते दहावी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना वह्या -पेन। वाटप करण्यात आले. तसेच शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
युवा...
