Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - Santosh Gandhe : राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त संतोष गंधे यांचा सत्कार
करियर नांदेड October 8, 2025

Santosh Gandhe : राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त संतोष गंधे यांचा सत्कार

बीटस्तरीय शिक्षण परिषद संपन्न – माहूर तालुक्यातील गोंडवाडी शाळेत कार्यक्रम
NNL TeamBy NNL TeamOctober 8, 20251
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माहूर| माहूर तालुक्यातील मौजे गोंडवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत बीटस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी माहूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार होते, तर प्रमुख अतिथी म्हणून सपोनी रमेश जाधवर (सिंदखेड पोलीस स्टेशन) व माजी गटशिक्षणाधिकारी रवींद्र जाधव उपस्थित होते.

या परिषदेमध्ये क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुरु गौरव पुरस्कार २०२५ हा शिक्षण क्षेत्रातील मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संतोष शेषराव गंधे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना संतोष गंधे सर यांच्या कार्याची प्रशंसा केली. त्यांनी गोंडवाडी शाळेच्या शैक्षणिक व भौतिक उन्नतीसाठी दिलेले योगदान, तसेच नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षांमधील विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाचा उल्लेख सर्वांनी केला.

विशेष व्याख्याते म्हणून उपस्थित असलेल्या प्रा. तुषार तास्के यांनी आपल्या व्याख्यानात म्हटले की, “सामाजिक बांधिलकी आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर व्यक्ती असामान्य कार्य करू शकते.” तर माजी गटशिक्षणाधिकारी आर. आर. जाधव यांनी सांगितले की, “विपरीत परिस्थितीतही उत्कृष्ट कार्य करणारे शिक्षकच खऱ्या अर्थाने पुरस्काराचे मानकरी ठरतात.”

अध्यक्षीय भाषणात गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार म्हणाले, “राज्यस्तरीय पुरस्काराचा प्रवास शिक्षकाच्या मेहनतीबरोबरच त्यांच्या कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच शक्य होतो.” यावेळी गत दोन वर्षांतील पुरस्कारप्राप्त शिक्षक सुरेंद्र कुडे सर व श्रीमती मीरा परोडवाड मॅडम यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला गोंडवाडी ग्रामस्थांसह करंजी बीटअंतर्गत करंजी, गोंडवडसा, सिंदखेड या केंद्रातील सर्व शिक्षक बांधव उपस्थित होते. शाळेचा सुसज्ज व आकर्षक परिसर सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

कार्यक्रमानंतर सर्वांना स्वादिष्ट स्वरुची भोजनाचा आस्वाद देण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सरपंच भास्कर पुरके, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश बावणे, तसेच गोंडवाडी ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गंधे सरांनी, तर आभार प्रदर्शन विजय वाघमारे सरांनी केले. संपूर्ण परिषद खेळीमेळीच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

of the State Level Ideal Teacher Award recipient Santosh Gandhe was felicitated
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articlevictims of house collapse : गटविकास अधिकाऱ्यांच्या निष्क्रियेतेमुळे घरांच्या पडझड बाधीतांचा अहवाल पं.स.च्या कपाटात अडकला
Next Article Cut down trees : गुंडवळ तलावाच्या बांधावरील झाडे तोडा: झाडे मोठी झाल्याने तलाव फुटण्याची शक्यता
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

flyover works at Gokunda : महामार्ग प्राधिकरणाने गोकुंदा येथील उड्डाण पुलांच्या कामांना गती देण्याची मागणी -NNL

January 12, 2025

Teachers’ Counci : शिक्षक परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी व्यंकट गंदपवाड तर जिल्हा कार्यवाहपदी प्रल्हाद राठोड यांची निवड

June 29, 2025

श्री केदार जगद्गुरू यांचे आध्यात्मिक व शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य – माजी मुख्यमंत्री चव्हाण -NNL

December 16, 2022

Virasaiva-Lingayat Sampraday ; विरशैव -लिंगायत सांप्रदायात दीक्षा संस्कार महत्वाचा; युवासंत दिगंबर शिवाचार्य महाराज यांचे प्रतिपादन हजारों भाविकांनी घेतली दिक्षा

January 28, 2025
Advertisement
टॉप बातम्या

वीज पडून टेंभुर्णी शिवारात बैलाचा मृत्यू; बैलपोळा सणापूर्वी शेतकऱ्यांवर दुखाच सावट -NNL

15th August Independence Day : 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिवस; लेखिका….वर्षा संजय जमदाडे -NNL

Amarnath rajurkar ; नेता आणि कार्यकर्ता यांचा दुवा ः अमरनाथ राजूरकर -NNL

Akshay Shinde’s firing : अक्षय शिंदेचा गोळीबार, पोलिसांच्या प्रत्युत्तरात झाला ठार, विरोधकांकडून चौकशीची मागणी -NNL

Industries Minister Uday Samant : नांदेड, यवतमाळसह पाच विमानतळांचे लवकरच हस्तांतरण ; जिल्हास्तरावर उद्योग भवन उभारणार : उद्योगमंत्री उदय सामंत

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?