नांदेड| वैद्यकीय प्रवेशासाठी हवा ओम आडकीनेला मदतीचा हात हा विषय नांदेड न्यूज लाइव्हने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य शिक्षणप्रेमी लोकांपुढे मंडळ होता. याची माहिती संगीताताई डक पाटील यांच्या पर्यंत पोहोचल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी थेट ओमच्या पालकांशी संपर्क करून ओम व त्याच्या पालकाला आपल्या कार्यालयात बोलावून घेत ओमच्या यशाबद्दल विठ्ठलमूर्ती देत सत्कार केला. आणि वैद्यकीय प्रवेशासाठी 51 हजार रुपयाची आर्थिक मदत करून मोठ्या मनाचा प्रत्यय दिला आहे.
सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असताना विविध विषयात सातत्याने संगीताताई डक पाटील व विठ्ठल पाटील डक नेहमी सर्वांना आपल्या परीने मदत करत असतातच परंतु ओम अडकिनेला वैद्यकीय प्रवेशासाठी अवघ्या दोन दिवसात सात लाख रुपयेची रक्कम उभी करायची होती या संदर्भातली सोशल मीडियातून पोस्ट अनेकांपर्यंत पोहोचली अनेक जण आपापल्या परीने मदतही करत होते. परंतु संगीता ताईनी स्वतःहून ओम व त्याच्या वडिलांना बोलावून घेत 51 हजार रुपयाची मदत आर्थिक मदत करून मनाचा मोठेपणा दाखविला आहे. या मदतीबद्दल ओम अडकणे च्या पालकांनी समाधान व्यक्त केले व सर्वांकडून संगीता ताई च्या या मदतरुपी कार्याचे कौतुक होत आहे.