नांदेड| दक्षिण मतदार संघातील तथा लोहा तालुक्यातील पंचशील बुद्ध विहार सोनखेड येथे दिनांक 22 जुनं 2025 रोजी रविवारी सकाळी ठीक 09:00 वाजता समता सैनिक दलाच्या साप्ताहिक परेड घेण्यात आला.


सविस्तर वृत्त असे की,डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाचे संरक्षण करता यावे. या उप्रांजळ द्देशाने निर्माण केलेल्या समता सैनिक दलाची स्थापना केली. आणि समाजातील नवयुवक, माजी सैनिक व माजी पोलीस प्रशासनातील कर्मचारी यांनी यामध्ये सहभागी होवुन धम्मकार्य करावे. तसेच या सैनिकांची वेळोवेळी उजळणी परेडच्या माध्यमातून व्हावी. व नवीन सैनिक हा समतेचा वारसा वृध्दिंगत करण्यासाठी तयार व्हावेत.



यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ.भिमराव यवंतराव आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच समता सैनिक दलाचे स्टाफ अॉफिसर तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष अॅड एस के भंडारे सर यांच्या आदेशानुसार समता सैनिक दलाचे साप्ताहिक परेड घेण्यात येत आहेत. तसेच भारतीय बौद्ध महासभा नांदेड जिल्हाध्यक्ष हौसाजी वारघडे , सेक्रेटरी रत्नाकर महाबळे, कोषाध्यक्ष बी डी कांबळे जिल्हा संरक्षण उपाध्यक्ष संतोष दुंडे , जिल्हा संरक्षण सचिव आनंद पुरभाजी गोडबोले व भीमराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोहा तालुका अध्यक्ष बापूसाहेब कापुरे, सेक्रेटरी धोंडीबा यांनभूरे,जी संघटक सुभाष खाडे,संरक्षण सचिव आकाश थोरात व तुकाराम खिल्लारे , महिला जिल्हा संरक्षण सचिव सुनिता खिल्लारे यांनी सोनखेडमध्ये समता सैनिक दल साप्ताहिक परेड संचलन घेतले होते.



यावेळी पत्रकार अमोल खिल्लारे , प्रमुख मार्गदर्शक भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संरक्षण उपाध्यक्ष तथा केंद्रीय शिक्षक मेजर संतोष दुंडे सर, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संरक्षण सचिव आनंद पुरभाजी गोडबोले, लोहा तालुका संरक्षण सचिव आकाश थोरात, सैनिक प्रकाश खिल्लारे, महिला जिल्हा संरक्षण सचिव सुनिता खिल्लारे, छाया सुर्यवंशी, ता. संरक्षण सचिव राधाबाई धुतराज व कविता निवडंगे, इंदुबाई खिल्लारे, नंदा खिल्लारे, अर्चना खिल्लारे, अल्का धुतराज, सुमनबाई सुर्यवंशी, गोकर्णाबाई खिल्लारे यांची परेडसाठी उपस्थिती होती.



