करियरनांदेड

Har Ghar Tiranga : हर घर तिरंगा 2025 पहिला टप्पा अंतर्गत रक्षाबंधनानिमित्त विविध उपक्रम

लोहा| येथून जवळच असलेल्या पेनूर येथील विद्यालयात शासनाचा प्रत्येक शालेय उपक्रम राबविण्यामध्ये एक पाऊल पुढे असणाऱ्या बळीराम पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पेनूर येथे शशिकलाबाई पाटील गवते गाईड पथकाने व शाळेतील इतर सर्व विद्यार्थीनी यांनी राखीपौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन कार्यक्रमात मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. त्यांच्याच शाळेत शिक्षण धेवून आज भारतमातेची सेवा व रक्षण करणाऱ्या भारतीय वीर सैनिक बांधवांना स्वनिर्मित पर्यावरणपुरक राख्या बांधून त्यांचे औक्षण केले.

त्याचबरोबर एक राखी माझ्या सैनिक भावासाठी या उपक्रमाअंतर्गत त्यांनी स्वतः बनवलेलया आकर्षक तिरंगा राख्या व भावनिक सदेश असलेली भेटकार्ड, शुभेच्छा सदेश व चॉकलेट असलेली बंद लिफाफे मुख्याध्यापक राठोड ए.एन. यांच्याकडे जमा केले. यावेळी दशरथ गवते (भा.ति.सी.पु.बेळगाव), नागनाथ शिवाजी इंडियन आर्मी यांनी सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी यांना सैनिकांची मेहनत, त्याग,देशप्रेम, कर्तव्यनिष्ठा या विषयी प्रेरणा देतांना या शाळेविषयीच्या सुखद आठवणी सांगितल्या. आपल्या भाषणातून कु.तनुजा गवते, ऋतुजा गवते, साधना पांचाळ यांनीही आपल्या सैनिक भावांना त्यांच्या प्रति असणाऱ्या भाषणा व्यक्त केल्या. कार्यक्रमाची सुरूवात वंदेमातरम गिताने करण्यात आली. त्यानंतर लगेचच 9 ऑगस्ट क्रांति दिनानिमित्त ज्ञात-अज्ञात थोर क्रांतीकारकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

WhatsApp Image 2025 08 10 at 8.51.25 PM.jpeg Har Ghar Tiranga : हर घर तिरंगा 2025 पहिला टप्पा अंतर्गत रक्षाबंधनानिमित्त विविध उपक्रम

दरम्यान शाळेतील 8 वी ते 12 वी च्यासर्व विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थीनींनी राख्या बांधल्या. सैनिक बांधवांनी व स्काऊट यांनी गाईड व इतर सर्व विद्यार्थीनी बहिनींना एक पेन व खाऊ दिला. वरील संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रिडा-सांस्कृतिक व स्काऊट विभाग पम्रुख वाघमारे एस.एन.यांनी सर्वांचे आभार मानले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. हर घर तिरंगा 2025 हा समाज उपयोगी कार्यक्रम विद्यालयाने राबविल्याबद्दल बळीराजा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अशोक पाटील गवते यांनी सर्व स्काऊट गाईड यांचे कौतुक केले व हर घर तिरंगा 2025 दुसऱ्या टप्यासाठी शुभेच्छा दिल्या.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!