नांदेड। येथील नवा मोंढ्यातील पेस्टीसाईड्चे नामाकिंत व्यापारी सचिन कासलीवाल यांनी किटकनाशक क्षेत्रातील मोठ्या कंपन्या असलेल्या अदामा, गोदरेज, एमएमसी, बीएएसएफ या कीटनाशक कंपन्या च्या मनमानी व शेतकरी हितास बाधक असलेल्या गळचेपी धोरणा संदर्भात स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी व हवामान तज्ञ पंजाबराव डक यांची भेट घेऊन त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील या लढ्यात सहभागी होण्याची विनंती केली.


भेटी दरम्यान श्री सचिन कासलीवाल यांनी निदर्शनास आणून दिले की शेतकऱ्यांना पेस्टिसाइड कंपन्या जाणीव पूर्वक चढ्या दराने किटकनाशकं खरेदी करण्यास भाग पाडतात त्यासाठी मोठ्या कंपन्यांनी आपली यंत्रणा उभारली आहे आणि शेतकऱ्यांसाठी भविष्यात हा मोठा धोका असून कंपन्या म्हणतील त्या दराने किटकनाशकं खरेदी करावे लागतील यावर हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी सांगितले की याबाबत मी शेतकऱ्यांना माझ्या यूट्यूबचैनल,व्हाट्सअप ग्रुप वर आणि सर्व समाजमाध्यमावर यासंदर्भातील जनजागृती करणार आणि तुमच्या सोबत उभा राहणार असे आश्वासन हवामान तज्ञ श्री पंजाबराव डक यांनी दिले.


किटकनाशक क्षेत्रातील मोठ्या कंपन्या असलेल्या अदामा, गोदरेज, एमएमसी, बीएएसएफ या कीटनाशक कंपन्या आपल्या मनमानी कारभारानुसार शेतकरी हितास तिलांजली शेतकऱ्यांकडून मनमानी किंमत वसूल करण्यासाठी बेकायदेशिर रित्या कृषी केंद्र चालकांवर सक्ती करण्यात येत आहे. आजघडीला किटक नाशकाचे दर मोठ्या प्रमाणात आहेत.तसेच शेतकी औषधे विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता होत आहे त्याबरोबरच अमुक वितरकाकडूनच तमूक माल घेण्याच्या सक्तीमुळे व्यापारी वर्गात भितीचे वातावरण तयार झाले असल्याची माहीती पेस्टीसाईड विक्रेते श्री सचिन कासलीवाल यांनी दिली आहे.



आजघडीच्या सद्य परिस्थितीत कीटकनाशक निर्मिती कंपन्यांवर मेहरबानी असल्याने शेतकऱ्यांना किटकनाशकं हे चढ्या दरानेच खरेदी करावी लागतात यावर कृषी विभागाने त्वरीत लक्ष घालून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवविण्याची मागणी ही श्री सचिन कासलीवाल यांनी केली आहे.

खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांवरील रोगांना नियंत्रित करण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करणे हे शेतकऱ्यांसाठी अनिवार्य झाले आहे परंतु कीटकनाशक निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून कीटकनाशकांच्या दरात वाढ केली जाते. या कंपन्यांच्या शासन स्तरावर कोणतेही नियंत्रण नसते. परिणामी, शेतकऱ्यांना चढ्या दरानेच कीटकनाशक खरेदी करावी लागत आहेत त्याशिवाय पर्याय उपलब्ध नाही आहे .
खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली. पिकाची लागवड झाल्यापासून ते काढणी होईपर्यंत पिकांवर विविध प्रकारच्या किडींचे हल्ले होतात. कीड नियंत्रणासाठी पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करावी लागते. कीटकनाशकाची निर्मिती करणाऱ्या शेकडो कंपन्यांनी त्यांची औषधी बाजारात आणलेली आहे. प्रत्येक कंपनीचे दरही वेगवेगळे असतात. मात्र, दरवर्षी कीडनाशक औषधांचे दर वाढत असल्याचे शेतकरी सांगतात. खासगी कीटकनाशक कंपन्या दरवर्षी कोट्यवधींचा नफा कमावितात ही सत्य बाब आहे असे श्री सचिन यांनी याविषयी अधिक माहीती देतांना ठासून सांगितले .


