Ashokrao Chavan : नांदेड जिल्ह्यात बीएसएनएल ९ टॉवर उभारणार; खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश -NNL

नांदेड| जिल्ह्याच्या भोकर व मुदखेड तालुक्यातील नऊ गावांमधील दूरसंचार सेवेत सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने टॉवर उभारण्यास मंजुरी दिली असून, यासाठी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी पाठपुरावा केला होता.

केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार भारत संचार निगम लिमिटेड म्हणजे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना या टॉवरच्या उभारणीसाठी जमीन भाडे तत्त्वावर घेण्यास किंवा संपादन करण्यासंदर्भात आदेश जारी करण्यात आले आहेत. या गावांमध्ये भोकर तालुक्यातील पाकी, पाकी तांडा, जामदरी, इळेगाव, सावरगाव माळ, भुरभुशी, देवठाणा तर मुदखेड तालुक्यातील दरेगाव आणि पिंपळकौठा मगरे या गावांचा समावेश आहे.

संबंधित गावकऱ्यांनी आपल्या गावात दर्जेदार दूरसंचार सेवा मिळत नसल्याची तक्रार खा. अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली होती. त्यानंतर त्यांनी या संदर्भात दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह बीएसएनएलच्या नवी दिल्ली व मुंबई येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्याच प्रयत्नांना यश येत या नऊ गावांमधील दूरसंचार सेवा उन्नत करण्यासाठी केंद्र सरकारने ९ टॉवर उभारण्यास मंजुरी दिली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button