नवीन नांदेड l सेवानिवृत्त नायब तहसीलदार विश्वंभर चांदोजी गिरडे पाटील यांचे अल्पशा आजाराने सिडको येथील निवासस्थानी 2 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता निधन झाले, मृत्यू समयी वय त्यांचे वय 77 वर्षे होते. त्यांचा पश्चात दोन मुले,चार मुली,जावाई,नातु नातवंडे असा परिवार आहे.
नांदेड तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार म्हणून सेवा बजावली होती, सेवानिवृत्ती नंतर सामाजिक कार्यासह,जेष्ठ नागरिक संघ , यासह विविध धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग होता, ते नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा शिवसेना शिंदे गटाचे नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे, अभिजित गिरडे यांचे ते वडील होत .
त्यांचा पार्थिव देहावर 2 डिसेंबर रोजी दुपारी 4:00 वाजता सिडको येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघ आमदार आनंदराव पाटील बोढारंकर, यांच्या सह विविध राजकीय पक्षांच्ये पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह परिवारातील सदस्य उपस्थित होते.