नांदेडस्पोर्ट्स

The thrill of wrestling : तळपत्या उन्हात रंगला कुस्त्यांचा थरार; श्री परमेश्वर यात्रेत जल्लोषाची शिखरे

हिमायतनगर, अनिल मादसवार| येथील श्री परमेश्वर यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेला यंदा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. सकाळपासूनच परिसरात उत्साहाचे वातावरण होते. स्पर्धेपूर्वी श्री परमेश्वर मंदिरातून हलगीच्या गजरात भगवा ध्वज आणि चांदीची गदा हाती घेऊन भव्य मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणूक कुस्ती मैदानात पोहोचताच ध्वज पूजन करून नारळ फोडत स्पर्धेची विधिवत सुरुवात करण्यात आली. दुपारी १ वाजता लहान बालकांच्या संत्रा-मोसंबीच्या कुस्त्यांनी रंगत आणली. त्यानंतर विविध बक्षीसांच्या कुस्त्यांना प्रारंभ झाला.

तळपत्या उन्हाची पर्वा न करता पैलवानांनी मैदान गाजवले. दुपारी २ नंतर १०, २०, ३०, ४० आणि ५० रुपयांच्या कुस्त्यांचा फड रंगला आणि प्रेक्षकांनी मैदान अक्षरशः गच्च भरून टाकले. अंगावर येणाऱ्या उन्हातही प्रत्येक डावाला टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्यांचा जल्लोष उसळत होता.

रात्री उशिरापर्यंत प्रकाशझोतात कुस्त्या सुरू राहिल्या. 100, 200, 500, 1000 च्या 20 कुस्त्या , 2000 च्या 10 कुस्त्या , 5000 च्या 5, आणि तिसऱ्या क्रमांकाची 7000 रुपयाची कुस्ती, दुसऱ्या क्रमांकाची 11111 रुपयाची तर पहिल्या नंबरची मानाची कुस्ती 21000 हजाराची कुस्ती संपन्न झाली. या कुस्त्या रात्रीच्या प्रकाश झोतात 8 वाजेपर्यंत सुरु होत्या. मातीचा सुगंध, हलगीचा गजर आणि पैलवानांचा जोश यामुळे संपूर्ण परिसर कुस्त्यांच्या थराराने भारावून गेला होता. यात्रेतील ही महत्त्वाची कुस्ती स्पर्धा उत्साहाच्या शिगेला पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या वेळी उपाध्यक्ष महावीरसेठ श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते, यात्रा सब कमेटी अध्यक्ष सुभाष शिंदे, कुस्ती स्पर्धेचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष रफिक सेठ, उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, नगरसेवक डॉ. राजेंद्र वानखेडे, नगरसेवक आशिष सकवान, नगरसेवक विठ्ठल ठाकरे, सरदार खान, पोलीस निरीक्षक अमोल भगत, शंकर पट समिती अध्यक्ष संतोष गाजेवार, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, सचिव श्याम पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य समद खान, नारायण माने सोनारीकर, उदय देशपांडे, राम नरवाडे, सदाशिव सातव.

Oplus_16908288

संचालक राजाराम झरेवाड, वामनराव बनसोडे, अ‍ॅड. दिलीप राठोड, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, गजानन चायल, गजानन हार्डफकर, प्रवीण कोमावार, मारोती लुमदे, प्रतीक ठाकरे, बाळू मेंडके, कलीम भाई, बाबुराव बोड्डेवार, विठ्ठल ऐरनकर, जितू सेवनकर, पापा पार्डीकर, खुद्दूस मौलाना, सुभाष दारवाडे, वैभव डांगे, मुन्नाभाऊ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. एकूणच, श्री परमेश्वर यात्रेतील कुस्ती स्पर्धेने परंपरा, क्रीडा आणि उत्साह यांचा अद्भुत संगम घडवून आणत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button