Saturday, June 27

Tag: in the scorching sun

A drop of relief : “तापत्या उन्हात जीवाला थेंबभर दिलासा…”

A drop of relief : “तापत्या उन्हात जीवाला थेंबभर दिलासा…”

नांदेड, फोटो गॅलरी
तापत्या उन्हाच्या झळा फक्त माणसांनाच नाही, तर निसर्गातील मुक्या जीवांनाही तेवढ्याच तीव्रतेने जाणवत आहेत. उन्हाची तीव्रता वाढत असताना पाण्याचा एक थेंबही त्यांच्या जगण्यासाठी अमृत ठरत आहे. याच जाणिवेतून पक्षी मित्रांनी आपल्या घराच्या अंगणात, परसबागेत आणि गच्चीवर मातीच्या भांड्यात पाण्याची सोय करण्यास सुरुवात केली. हळूहळू पक्षी त्या ठिकाणी येऊ लागले, थेंबभर पाण्याने आपली तहान भागवू लागले — आणि या छोट्याशा उपक्रमाने निसर्गाशी एक जिव्हाळ्याचं नातं पुन्हा जुळू लागलं. आजच्या या दिवशी प्रत्येकाने आपल्या परिसरात पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करावी, हीच एक छोटी पण मोलाची मानवतेची कृती ठरेल. पक्षी मित्र छायाचित्रकार विजय होकर्णे नांदेड...
The thrill of wrestling : तळपत्या उन्हात रंगला कुस्त्यांचा थरार; श्री परमेश्वर यात्रेत जल्लोषाची शिखरे

The thrill of wrestling : तळपत्या उन्हात रंगला कुस्त्यांचा थरार; श्री परमेश्वर यात्रेत जल्लोषाची शिखरे

नांदेड, स्पोर्ट्स
हिमायतनगर, अनिल मादसवार| येथील श्री परमेश्वर यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेला यंदा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. सकाळपासूनच परिसरात उत्साहाचे वातावरण होते. स्पर्धेपूर्वी श्री परमेश्वर मंदिरातून हलगीच्या गजरात भगवा ध्वज आणि चांदीची गदा हाती घेऊन भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक कुस्ती मैदानात पोहोचताच ध्वज पूजन करून नारळ फोडत स्पर्धेची विधिवत सुरुवात करण्यात आली. दुपारी १ वाजता लहान बालकांच्या संत्रा-मोसंबीच्या कुस्त्यांनी रंगत आणली. त्यानंतर विविध बक्षीसांच्या कुस्त्यांना प्रारंभ झाला. तळपत्या उन्हाची पर्वा न करता पैलवानांनी मैदान गाजवले. दुपारी २ नंतर १०, २०, ३०, ४० आणि ५० रुपयांच्या कुस्त्यांचा फड रंगला आणि प्रेक्षकांनी मैदान अक्षरशः गच्च भरून टाकले. अंगावर येणाऱ्या उन्हातही प्रत्येक डावाला टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्यांचा जल्लोष उसळत होता. रात्री उशिरापर्यंत ...
error: Content is protected !!