करियरनांदेड

Notary awarded : भोकरच्या ॲड. शिवाजी कदम यांना नोटरी प्रदान

भोकर,साई चौहान| येथील न्यायालयातील ॲड .शिवाजी कदम नागापूरकर यांना भारत सरकारने दिनांक १६जुलै रोजी नोटरी प्रमाणपत्र प्रदान केले.

भोकर तालुक्यातील नागापूर येथील रहिवाशी ॲड शिवाजी कदम हे२००९ पासून वकिली करतात.त्यांनी उपेक्षित घटकांची वकिली न्यायालयात व न्यायालयाबाहेर केली. वेगवेगळ्या शासकीय कार्यालयात जाऊन त्यांची बाजू मांडली. शेतकऱ्यांची महसुली प्रकरणे, शेतीची प्रकरणे, रस्त्याची प्रकरणे मार्गी लावली. अनेक फौजदारी खटले यशस्वीरित्या हाताळून लोकांना न्याय मिळून दिला.तालुक्यातील अनेक गावात जाऊन कायद्याची माहिती दिली.

वकिली सोबतच सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात.मोफत वैद्यकीय सेवा, मोफत विधी सल्ला यांची माहिती देण्याचे कामही ॲड.शिवाजी कदम यांनी केले. केलेल्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना संपुर्ण महाराष्ट्र राज्यासाठी नोटरी प्रमाणपत्र प्रदान केले. सरकारकडून नोटरी प्रदान करण्यात आल्याने अनेकांनी ॲड.शिवाजी कदम यांचे अभिनंदन केले आहे

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button