नांदेड

राजपुत (क्षत्रिय) समाजातर्फे हिंदू कुलभूषण राष्ट्रवीर विरशिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी जयंती साजरी-NNL

नांदेड। राजपुत (क्षत्रिय) समाज बांधवांच्या वतीने हिंदू कुलभूषण राष्ट्रवीर विरशिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर शहरातील महाराणा प्रताप सिंहजी यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होवून अनेकांनी अभिवादन केले.

हिंदू कुलभूषण राष्ट्रवीर विरशिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या जयंतीनिमित्त  आज शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आज सकाळी मनपाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम व सहकार्‍यांनी पुतळ्याजवळ येवून पुष्पहार अर्पण केला व अभिवादन केले. शहरातील चैतन्यनगर भागातून आज भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. ढोल ताश्यांच्या गजरात तेथून मिरवणूक काढून महाराणा प्रतापसिंहजी यांच्या पुतळ्यापर्यंत हि मिरवणूक आली. त्यानंतर मिरवणुकीतील सर्व मान्यवरांनी त्यांना अभिवादन केले.

IMG 20240609 211102 राजपुत (क्षत्रिय) समाजातर्फे हिंदू कुलभूषण राष्ट्रवीर विरशिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी जयंती साजरी-NNL

यानिमित्त शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, अ‍ॅड.शामभाऊ बन, शिवसेना शहर संघटक पिंटू सुनपे यांच्यातर्फे शोभायात्रेचे भाग्यनगर येथे स्वागत करण्यात आले व चहा-नास्ता ठेवण्यात आला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राम चव्हाण, दक्षिणचे शहर प्रमुख अर्जूनसिंह ठाकुर, युवासेना जिल्हा युवाधिकारी अक्षय वट्टमवार, भवानीसिंह ठाकुर, तसेस नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील राजपुत समाज बांधव व शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद उर्फ बंडू खेडकर, प्रकाश मारावार युवासेना जिल्हा युवाधिकारी अक्षय वट्टमवार, शहरप्रमुख अर्जुन ठाकूर यांनी तसेच माजी उपमहापौर आनंद चव्हाण यांनीही पुतळ्याजवळ येवून पुष्पहार अर्पण केला व विनम्र अभिवादन केले.

आजच्या मिरवणुकीत तसेच अभिवादन करण्यासाठी भगवानसिंग चंदेल, मोहनसिंग तौर, बालाजी चव्हाण, अर्जुन ठाकूर, अमरसिंह चव्हाण, शरदसिंह चौधरी, बाबुसिंह चव्हाण, उध्दव कल्याणकर, प्रदीप व्यवहारे, महेंद्रसिंह ठाकूर, विठ्ठलसिंह गहरेवार, बलदेवसिंह चव्हाण, राजूसिंग चंदेल, भरतसिंह ठाकूर, गजेंद्रसिंह चंदेल, मुन्नासिंह परदेशी, नारायण बुंदेल, दिपक ठाकूर, गोविंदसिंह चौधरी, संतोषसिंह चौधरी, बाळू सहारे, पवनसिंह बैस, डॉ.राम चव्हाण, जिंतूसिंह चंदेल, अ‍ॅड.दिपक शर्मा यांच्यासह अनेक महिला, युवक यावेळी उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!