राजपुत (क्षत्रिय) समाजातर्फे हिंदू कुलभूषण राष्ट्रवीर विरशिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी जयंती साजरी-NNL
नांदेड। राजपुत (क्षत्रिय) समाज बांधवांच्या वतीने हिंदू कुलभूषण राष्ट्रवीर विरशिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर शहरातील महाराणा प्रताप सिंहजी यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होवून अनेकांनी अभिवादन केले.
हिंदू कुलभूषण राष्ट्रवीर विरशिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या जयंतीनिमित्त आज शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आज सकाळी मनपाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम व सहकार्यांनी पुतळ्याजवळ येवून पुष्पहार अर्पण केला व अभिवादन केले. शहरातील चैतन्यनगर भागातून आज भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. ढोल ताश्यांच्या गजरात तेथून मिरवणूक काढून महाराणा प्रतापसिंहजी यांच्या पुतळ्यापर्यंत हि मिरवणूक आली. त्यानंतर मिरवणुकीतील सर्व मान्यवरांनी त्यांना अभिवादन केले.
यानिमित्त शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्ह...
