नांदेड| दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात 19 सप्टेंबर रोजी घडलेल्या धाडसी प्रसंगात रेल्वे कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे एका सहकाऱ्याचे प्राण वाचले.


कर्तव्यावर असताना शुभाष आर. राठोड (OS/कार्मिक विभाग) यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. या गंभीर स्थितीत तातडीने मदतीची गरज असताना, तेथे उपस्थित असलेले महारुद्र दिगोले (Sr. Section Officer/लेखा विभाग तसेच Civil Defence Instructor, SCR) यांनी त्वरित CPR दिला व श्वसनमार्ग साफ करून राठोड यांचे प्राण वाचवले.

दिगोले यांनी NDRF नागपूर व Civil Defence/SCR संस्थेतून आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. त्यांच्या धैर्य, कौशल्य व तत्परतेमुळे सहकाऱ्याचे प्राण वाचणे शक्य झाले.


यानंतर राठोड यांना नारायणा मल्टिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. या प्रसंगी महेंद्र पकळे (Ch.OS) यांनीही महत्त्वाचे सहकार्य केले. हा धाडसी आणि अनुकरणीय प्रसंग दक्षिण मध्य रेल्वेतील कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे व सेवाभावाचे उत्तम उदाहरण ठरला आहे.


