क्राईमनांदेड

Raid on sand ghat of Godavari bank water : उमरी हद्दीतील मनुर शिवारातील गोदावरी बैंक वॉटरच्या रेती घाटावर छापा; १२ लाखाचे साहित्य नष्ट

नांदेड/उमरी| नांदेड जिल्ह्यात पोलिसांकडून अवैध वाळू उपसा करणाऱ्या घाटावर कारवाई करण्याचे सत्र सुरूच आहे. या मोहिमेत आणखी एक कार्यवाही नांदेड जिल्ह्यातील उमरी हद्दीतील मनुर शिवारातील गोदावरी नदिपात्राचे परमेश्वर मंदिराचे पाठीमागील गोदावरीचे बैंक वॉटरच्या नाल्यात करण्यात आली आहे. यात एकूण १२ लक्ष ४० हजार रुपये किंमतीची रेती व रेती उपसा करण्याचे साहीत्य नष्ट करण्यात आली आहेत.

नांदेड जिल्ह्यामध्ये वाळु माफियाकडुन अवैध मार्गाने वाळू उपसा व वाहतुक करुन शासनाचा लाखो रुपयाचा महसुल बडवित आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी आपापल्या पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळु उपसा व वाहतूक होत असल्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने (Operation Flush Out) अंतर्गत अपर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे भोकर, प्रशांत संपत्ते उप विभागीय पोलीस अधीकारी, धार्मबाद यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक अंकुश माने यांना दिनांक ०७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ०९.०० वाजता उमरी हद्दीतील मनुर शिवारातील गोदावरी नदिपात्राचे परमेश्वर मंदिराचे पाठीमागील गोदावरीचे बैंक वॉटरच्या नाल्यात काही लोक रेती काडीत आहेत.

IMG 20250208 WA0011 Raid on sand ghat of Godavari bank water : उमरी हद्दीतील मनुर शिवारातील गोदावरी बैंक वॉटरच्या रेती घाटावर छापा; १२ लाखाचे साहित्य नष्ट

सदर ठिकाणी तराफे व बोट आहे. अशी गोपनिय माहिती मिळाली यावरुन वरिष्ठांना सूचना देवून पंच व महसुलचे अधिकारी, कर्मचारी यांना घेवून छापा मारला. यावेळी ८ लाख रुपयाची एक लोखंडी मोठी बोट आणि ज्यास एक लोखंडी लहान बोट ज्यावर पाईप व इंजिन बसविलेले, ४ लाख रुपयाचे चार तराफे प्रत्येक तराफ्यावर अर्धा, अर्धा ब्रास रेती प्रत्येक ताफ्याची किंमत १ लाख रुपये प्रमाणे, १० हजार रुपयाच्या चार तराफ्या वरील अंदाजे २ ब्रास रेती, ३० हजारांची एक हिरो स्लेंडर कंपनिची काळ्या रंगाची गाडी जिचा पासिंग क्रमांक MH २६ CF ०३०४ असेलेली मिळाली. त्या ठिकाणी एकूण १२,४०,०००/- रुपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने सदरचा मुद्देमाल व तराफे पोलीस व महसुलचे अधिकारी यांनी पंचनामा करुन जिलेटिनच्या साह्याने रेतीसह गोदावरी नदीचे बैंक वॉटरच्या पाण्यात जागेवरच नष्ट करण्यात आले.

IMG 20250208 WA0009 Raid on sand ghat of Godavari bank water : उमरी हद्दीतील मनुर शिवारातील गोदावरी बैंक वॉटरच्या रेती घाटावर छापा; १२ लाखाचे साहित्य नष्ट

सदर ठिकाणी एक उत्तर प्रदेशचा तराफा चालक गोविंदा तेज नाराण भारती वय ३३ वर्ष व्यवसाय तराफा चालक रा. परबतपुर जि. चलीया उत्तरप्रदेश व पळुन गेलेले सचिन पाटील व सुरेश पाटील यांनी गोदावरी नदीपात्रातील अवैध रित्या रेतीचे उपसा करुन तिची चोरटी वाहतुक करण्याचे उद्देशाने रेती काढून पर्यावरणाचा ऱ्हास करीत असतांना मिळुन आले. म्हणुन त्यांचे विरुध्द पोलीस स्टेशन उमरी येथे कलम ३०३(३),३ (५) भारतीय न्याय सहीता व सह खाणी व खनीज (विकास व नियमन) कायदा १९५७ चे कलम ४ व २१ सह पर्यावरण सरक्षण अधिनियम १९८६ ची कलम ९, १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गोविंद शिंदे हे करीत आहेत.

IMG 20250208 WA0008 Raid on sand ghat of Godavari bank water : उमरी हद्दीतील मनुर शिवारातील गोदावरी बैंक वॉटरच्या रेती घाटावर छापा; १२ लाखाचे साहित्य नष्ट

हि कार्यवाही अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराय धरणे अपर पोलीस अधीक्षक भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, प्रशांत संपत्ते उप विभागीय पोलीस अधीकारी धर्माबाद यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक अंकुश माने, प्रभारी अधिकारी पालीस ठाणे उमरी, पोलीसउप निरिक्षक सचिन आरमळ, सपोउपनि देवराव वडजे, सुदर्शन धांदू, पोहेकों गोविंद शिंदे, रामन फकिरा गेडाम, केळकर, पोकों माधय पवार, अरविंद हैबतर, प्रितम डोम्पल्ले, शेख फिरोज, चालक पोलीस कॉन्स्टेबल गुरुपवाड होमगार्ड हर्षद लाडगे, अविनाश राठोड, उस्कलवाड, सोनाई आदींनी केली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!